महापौराने चक्क मगरीसोबत केलं लग्न

वधू आणि वरसाठी लग्न हा क्षण खूप महत्वाचा असतो.आयुष्यभराच्या जोडीदारासोबत हसत खेळत आयुष्य घालवायचं असे अनेक जण स्वप्नं बघतात.मात्र मेक्सिको मध्ये एक विचित्र घटना घडली आहे.

महापौराने चक्क मगरीसोबत केलं लग्न

वधू आणि वरसाठी लग्न हा क्षण खूप महत्वाचा असतो.आयुष्यभराच्या जोडीदारासोबत हसत खेळत आयुष्य घालवायचं असे अनेक जण स्वप्नं बघतात.मात्र मेक्सिको मध्ये एक विचित्र घटना घडली आहे.मेक्सिको मधील महापौराने लग्न केले आहे.परंतु या लग्नातील वधू ही माणूस नसून ती एक मगर आहे. तसेच हा वर देखील एक सामान्य माणूस नाही तर तो मेक्सिकोच्या सॅन पेड्रो हुआमेलुला शहराचा महापौर आहे.मीडिया रिपोर्ट्सनुसार, मेक्सिकोच्या सॅन पेड्रो हुआमेल्युलाचे महापौर क्वेटर ह्यूगो यांनी हे अनोखं लग्न केलं आहे. या लग्नाला हजारो लोक उपस्थित होते आणि वराच्या नातेवाईकांनीही सर्व विधी पार पाडले.

आता तुम्हाला हा ही प्रश्न पडला असेल की, हे सगळं कशासाठी? तर यामागचं कारण तुम्हाला आश्चर्यचकीत करेल.या खास लग्नामागील कारणही खूप खास आहे. वास्तविक ही मेक्सिकोची जुनी परंपरा आहे. माणसाचे पर्यावरण आणि प्राणी यांच्याशी असलेले नाते घट्ट करण्यासाठी अशा प्रकारचे लग्न केले जाते.केल्याने भगवंताकडून इच्छित वस्तू प्राप्त होते, अशी श्रद्धा आहे. चांगला पाऊस आणि जास्त मासे मिळावेत यासाठीच बहुतेक लोक असे कार्यक्रम आयोजित करतात. महापौरांनीही याच हेतूने हा विवाह केला.मेक्सिकोमध्ये मगरीशी लग्न करण्याची परंपरा खूप जुनी आहे.

ही परंपरा 1789 पासून सुरू असल्याचे येथील लोक सांगतात. दरम्यान या अंतर्गत मगरीचे पहिले नाव ठेवण्यात आले आहे. यानंतर लग्नाची तारीख ठेवली जाते आणि सर्वांना लग्नाचे आमंत्रण पाठवले जाते. यानंतर सर्वांसमोर विवाह पार पाडला जातो. या लग्नादरम्यान, मगरीला पांढर्‍या लग्नाच्या पोशाखात वधूप्रमाणेच तयार केले जाते. त्यानंतर स्थानिक नेते त्याच्याशी लग्न करतात आणि स्वतःला दैवी पुरुष समजतात. या दरम्यान, ते मादी मगरीचे चुंबन देखील घेतात, परंतु यावेळी मगरीचे तोंड कापडाने बांधलेले असते जेणेकरून ती वराला कोणत्याही प्रकारे इजा करू शकणार नाही.

Exit mobile version