उद्या पंतप्रधानांच्या हस्ते होणार, वीर सावरकर विमानतळाच्या नवीन टर्मिनलचं उद्घाटन

पोर्ट ब्लेअर टर्मिनल तब्बल ७१० कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलं आहे.

उद्या पंतप्रधानांच्या हस्ते होणार, वीर सावरकर विमानतळाच्या नवीन टर्मिनलचं उद्घाटन

भारताच्या अंदमान-निकोबार (Andaman-Nicobar) बेटावरील पोर्ट ब्लेअर विमानतळावरील (Port Blair Airport) नवीन टर्मिनलचं पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते उद्धाटन पार पडणार आहे. या नवीन पोर्ट ब्लेअरमधील वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीचे उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी, १८ जुलै रोजी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे करणार आहेत. तसेच केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया (Jyotiraditya Scindia) सकाळी ९ वाजता विमानतळावर पोहोचतील, तर दीड तासानंतर पंतप्रधान मोदी टर्मिनल इमारतीचे डिजिटल पद्धतीने उद्घाटन करतील, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

पंतप्रधान कार्यालयाने (PMO) दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी मंगळवारी अंदमान-निकोबार बेटांमधील पोर्ट ब्लेअर येथील वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीचं ऑनलाईन उद्घाटन करतील. सुमारे ७१० कोटी रुपये खर्चून बांधलेल्या नवीन टर्मिनल इमारतीमुळे अंदमान आणि निकोबारमधील कनेक्टिव्हिटीला प्रचंड चालना मिळणार आहे. याशिवाय केंद्रशासित प्रदेश अंदमान निकोबारला जागतिक दर्जाच्या विमानतळाची भेट मिळणार आहे. यामुळे केंद्रशासित प्रदेशाचा संपर्क सुद्धा सुधारेल. तसेच या विमानतळामुळे स्थानिक लोकांसाठी रोजगारच्या नव्या संधीही निर्माण होतील. या प्रकल्पात एकूण ४०,८०० चौरस मीटर क्षेत्रात बांधकाम केले जाणार आहे. नवीन टर्मिनल इमारतीतून दरवर्षी अंदाजे ५ दशलक्ष प्रवाशांना सुविधा पुरवली जाईल. नवीन टर्मिनल सुरु झाल्यानंतर अंदमान आणि निकोबारमधील पर्यटनाला गती मिळेल यामुळे स्थानिक अर्थव्यवस्था सुद्धा बळकट होईल.

पोर्ट ब्लेअर टर्मिनल तब्बल ७१० कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलं आहे. याशिवाय पोर्ट ब्लेअर विमानतळावर ८० कोटी रुपये खर्चून दोन बोईंग-७६७-४०० आणि दोन एअरबस-३२१ प्रकारच्या विमानांसाठी उपयुक्त असलेले ऍप्रनही बांधण्यात आले आहेत. यानंतर आता या विमानतळावर एकावेळी १० विमाने उभी करता येणार आहेत. अधिकृत निवेदनानुसार विमानतळ टर्मिनलची वास्तुशिल्प रचना निसर्गापासून प्रेरित आहे. हे नवं टर्मिनल शंखाच्या आकाराच्या संरचनेसारखं दिसतं.

हे ही वाचा:

चेन्नई सुपर किंग्सचा सलामी फलंदाज विजेतेपद जिंकताच अडकला लग्न बंधनात बार्क इंडियाच्या रिपोर्टनुसार Rupali Ganguly ची अनुपमा अव्वल स्थानावर Odisha Train Accident, रेल्वे अपघाताची माहिती देणारी व्यक्ती कोण?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version