spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Diwali Gift : चक्क मालकाने दिवाळी गिफ्ट म्हणून कर्मचाऱ्यांना कार आणि बाईक दिली

चेन्नईतील एका दागिन्यांच्या दुकानाच्या मालकाने आपल्या कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून कार आणि बाइक दिल्या आहेत. आठ जणांसाठी कार आणि १८ जणांसाठी बाईक घेण्यासाठी मालकाला १.२ कोटी रुपयांचा खर्च केला आहे.

चलनी ज्वेलरी मार्टचे मालक जयंती लाल चैंथी यांनी अनोख्या दिवाळी भेटवस्तू दिल्याने काही कर्मचारी हैराण झाले, तर काहीजण आनंदाने रडले. माध्यमांशी बोलताना जयंती लाल यांनी सांगितले की त्यांच्या टीमने त्यांना सर्व उच्च पाठिंबा दिला होता आणि ते त्यांच्यासाठी दुसऱ्या कुटुंबासारखे होते.

ज्यांनी आपल्या ज्वेलरी शॉपमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना भेटवस्तू दिल्या आहेत त्या ज्वेलरी शॉपचे मालक जयंती लाल सांगतात की, त्यांनी त्यांच्या  कर्मचाऱ्यांना कार आणि २० कर्मचाऱ्यांना २० दुचाकी दिल्या आहेत. ते म्हणतात की, या लोकांनी मला त्यांच्या आयुष्यातील महत्वाचा वेळ दिला आहे. व्यापाऱ्यातील प्रत्येक चढ-उतारात ते माझ्यासोबत काम करत आहे. त्यामुळे त्यांच्या कामाला प्रोत्साहन देण्यासाठी या भेटवस्तू असल्याचे त्यांनी सांगितले.

या प्रकारची ही घटना काही पहिलीच नाही, याआधीही सुरतचे अब्जाधीश हिरे व्यापारी सावजी ढोलकिया यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना फ्लॅट, कार आणि इतर मौल्यवान भेटवस्तू दिल्या होत्या त्यावेळी त्या घटनेची जोरदार चर्चा झाली होती.

२०१६ मध्ये त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना पहिल्यांदाच दिवाळी बोनस म्हणून ४०० फ्लॅट आणि १,२६० कार दिल्या होत्या. त्यावेळीही या बातमीमुळे देशभरातील लक्ष वेधले होते. त्यानंतर, यंदा पुन्हा एकदा चेन्नईच्या या व्यावसायिकाने आपल्या कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून कार आणि दुचाकी दिल्याने अनेकांचे लक्ष वेधले आहे.

Latest Posts

Don't Miss