spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

भारतात चित्यांची दहशद वाढणार, संसदेत केंद्र सरकारची माहिती

दक्षिण आफ्रिकेत असलेल्या नामिबियामधून (namibiya) भारतात (India) १४ ते १२ चित्ते आणले जाणार आहेत. केंद्रीय पर्यावरण मंत्री अश्विनी कुमार चौबे यांनी राज्यसभेत या महत्वाच्या प्रकल्पाची बातमी दिली. त्यांनी सांगितलं कि येत्या ५ ते ६ वर्षात भारतात १४ ते १२ चित्ते आणले जाणार आहेत. यासाठी सरकारने नामिबिया सरकारशी करार केला आहे.

काही काळापूर्वीच नामिबियातून ८ चित्ते भारतात आणून मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये (Kuno National Park) सोडण्यात आले. त्यात ५ मादी तर ३ नरांचा समावेश आहे . कुनो येथे चित्ते स्थायिक झाले आहेत . चित्यांनी शिकार करण्यास सुरवात केली आहे . स्थलांतर झाल्यामुळे त्यांना भारतातील हवामानाशी जुळवून घायला वेळ लागतोय अशी बातमी देखील कानावर अली. संसदेत माहिती देत असताना केंद्रीय मंत्री म्हणाले कि, टायगर प्रकल्प सुरु झाल्यानंतर त्यांना भारतात जाण्यासाठी तब्बल ३८.७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. हा प्रकल्प २०२१/२२ पासून सुरू झाला होता, पुढे तो २०२५/२६ पर्यंत चालेल अशी शक्यता आहे.

चित्त्यांबद्दल अधिक माहिती देताना केंद्रीय मंत्री म्हणाले, चित्त्याना आणल्यानंतर सुरवातीला काही काळ त्यांना क्वॉरंटाईनमध्ये ठेवण्यात आला होत. त्यांच्या खाण्यापिण्याची नीट काळजी घेतली जातेय . त्यांच्यावर चोवीस तास देखरेख ठेवण्यात येत आहे. कुनो नॅशनल पार्कचे क्षेत्र संचालक उत्तम शर्मा यांनी सांगितलं की, आता सर्व चित्ते छान स्थायिक झाले आहेत . ते हळूहळू जंगलात प्रस्थापित होतील आणि जंगलाचा शोध घेतील. त्यानंतर स्वतःचं पोट भरण्यासाठी शिकारही करतील. त्यांची चोवीस तास देखरेख केली जात आहे.

कुनो नॅशनल पार्कचे क्षेत्र संचालक उत्तम शर्मा यांनी सांगितलं की, आता सर्व चित्ते सामंजस्य प्रस्थापित करतील आणि जंगलाचा शोध घेतील. त्यानंतर स्वतःचं पोट भरण्यासाठी शिकारही करतील. त्यांची चोवीस तास देखरेख केली जात आहे. उत्तम शर्मा यांनी सांगितलं की, नर चित्त्यांना शिकारीची सवय झाली आहे. तसेच, लवकरच मादा चित्ते देखील यात प्रभुत्व मिळवतील. चार हाय-रिझोल्युशन कॅमेऱ्यांद्वारे चित्तांवर नजर ठेवली जाईल. १६ वनरक्षकांचं पथक त्यांची देखरेख करणार आहे. प्रत्येक चित्त्यावर नजर ठेवण्यासाठी २ वनरक्षक तैनात करण्यात येणार आहेत. सुरक्षेसाठी स्निफर डॉगही बसवण्यात येणार आहे.

हे ही वाचा : 

2023 IPL Auction आयपीएलच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी! २०२३ आयपीएल लिलावाला आज होणार सुरुवात

Watch Video, चक्क लग्नात नवऱ्यामुलीने दिरासोबत धरला ठेका

Follow Us टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss