Saturday, July 6, 2024

Latest Posts

पालेभाज्यांचे भाव कडाडले; कोथिंबीर सह सर्व पालेभाज्या महागल्या!

एकीकडे उन्हाचा तडाखा तर दुसरीकडे अवकाळी पडलेल्या पावसामुळे शहरातील विविध भाजी बाजारात भाजीपाल्याच्या दरात वाढ होत आहे. या वाढलेल्या बाजारभावामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत असला तरी ग्राहकांना त्याचा मोठ्या प्रमाणात फटका बसत आहे.

एकीकडे उन्हाचा तडाखा तर दुसरीकडे अवकाळी पडलेल्या पावसामुळे शहरातील विविध भाजी बाजारात भाजीपाल्याच्या दरात वाढ होत आहे. या वाढलेल्या बाजारभावामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत असला तरी ग्राहकांना त्याचा मोठ्या प्रमाणात फटका बसत आहे. सध्या बाजारभावात ‘भाव’ खात असलेली “कोथिंबीर” आता गगनाला भिडत आहे. १० रुपयांना मिळणारी कोथिंबीरची जुडी ही तब्बल ७५ ते ८० रुपयांच्या घरात जाऊन पोहचली आहे. त्यामुळे गृहिणीचे भाजीपाल्यांचे रोजचे गणितच चुकत आहे.

“कोथिंबीर” (Corrionder) ही एक अशी गोष्ट आहे जी प्रत्येक गृहिणी रोजच्या जेवणामध्ये त्याचा समावेश करते. कोथिंबीर ही प्रत्येकाच्या घरात वापरलीच जाणारी पालेभाजी आहे. सकाळच्या नाश्त्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत पदार्थाची चव वाढवणारी कोथिंबीर ही आता सर्वसामान्यांना न परवडणारी झाली आहे. आवक कमी झाल्याने भाजीबाजारात कोथिंबीरला चांगलाच भाव मिळाला आहे.

काही दिवसांपासून महाराष्ट्रात उकाड्याचे प्रमाण वाढत असून उष्ण व दमट वातावरणामुळे काही भागात यलो अलर्ट (Yellow alert) जाहीर करण्यात आला आहे. या तापत्या उकाड्यामुळे भाज्यांचे नुकसानही होत आहे. राज्यातील अनेक भागात पाण्याची टंचाई भासत असल्यामुळे शेतमालाची आवकही बाधित झाली आहे. नेहमी बाजारपेठेत होणाऱ्या आवकापेक्षा ५० ते ६० टक्के आवक होत असल्यामुळे भाजीपाल्यांचे भाव कडाडले आहेत. पालेभाज्यांचा खप कमी असल्यामुळे ज्या काही पालेभाज्या बाजारात उपलब्ध आहेत त्यांचेही भाव अवाच्या सव्वा झाले आहेत. कोथिंबिरीच्या जुडी बरोबर कांदा व मेथीच्या जुडीचे भाव ही ५० रुपयांपर्यंत पोहचले आहेत.

शेतकऱ्यांकडून थेट भाजीपाला कृषी उत्पन्न बाजार समिती (Agricultural Produce Market Committee) मध्ये दाखल होऊन विक्रेत्यांकडून किरकोळ बाजारात विकण्यासाठी येतो. नियमित आवकेच्या सुमारे ५० ते ६० टक्के आवक कमी असल्यामुळे भाज्यांचे भाव हे २५ ते ३० रुपये पावशेरपासून ते १०० ते १२० किलो रुपयांपर्यंत पोहचले आहेत. या वाढत्या भावांमुळे सर्वसामान्य जनतेच्या खिशाला कात्री लागत आहे. तसेच, या वाढत्या उकाड्यापासून सुटका होण्यासाठी सर्व जण पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss