Coronavirus चीनमध्ये कोरोना वाढण्यामागचे प्रमुख कारण आले समोर, जाणून घ्या किती धोकादायक आहे हा प्रकार

Coronavirus चीनमध्ये कोरोना वाढण्यामागचे प्रमुख कारण आले समोर, जाणून घ्या किती धोकादायक आहे हा प्रकार

चीन, जपान, अमेरिकेत पुन्हा एकदा कोरोना संसर्गाचा वेग वाढला आहे. (Coronavirus New Variant) जगभरातील कोरोना प्रादुर्भावाचा वेग पाहता भारत सरकार ( Central Government ) अलर्ट झाले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय ( Mansukh Mandaviya ) आज देशातंर्गत कोविड तयारीबाबत महत्त्वाची बैठक बोलावली आहे. त्यामुळे देशात कोरोनासंदर्भात नव्या गाईडलाईन्स किंवा खबरदारीचे उपाय जारी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर, चीनमध्ये कोरोनाव्हायरसची वाढती प्रकरणे लक्षात घेता, भारत सरकारने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

हेही वाचा : 

मोदींनी दिली ‘भारत जोडो यात्रे’ला वॉर्निंग! राहुल गांधी घेतील का मोठा निर्णय, वाचा सविस्तर

चीनमध्ये कोविडची (China covid 19) प्रकरणे वाढण्याचे आणखी एक कारण म्हणजे त्याचे नवीन प्रकार. या प्रकाराचे नाव Omicron BF.7 आहे आणि ते Omicron प्रकारांच्या एक भाग आहे. म्हणजेच, ओमिक्रॉनचे जे प्रकार गेल्या वर्षी सापडले होते, हा प्रकार त्याच्या उत्परिवर्तनातून पुन्हा उदयास आला आहे आणि मोठी गोष्ट म्हणजे ती जुन्या प्रकारापेक्षा खूपच धोकादायक आहे.

चीन मधल्या या परिस्थितीमुळे पुन्हा एकदा कोरोनाची आकडेवारी वाढत आहे. या पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकारही सतर्क झालं आहे. केंद्र सरकारक़डून सर्व केंद्रशासित प्रदेश आणि राज्यांना पत्र पाठवण्यात आली आहेत. तसंच बाधितांच्या नमुन्यांचे जिनोम सिक्वेन्सिंग कऱण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आज केंद्रीय स्तरावर याबाबत बैठकही होणार आहे. त्यानंतर निर्बंधांबद्दल महत्त्वाची माहिती समोर येऊ शकते.

Republic Day यंदा प्रजासत्ताक दिन परेडसाठी महाराष्ट्राचा चित्ररथ नसणार

राज्यात गेल्या २४ तासांत २० नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत, तर संसर्गामुळे एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. महाराष्ट्रात सध्या १३२ सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. पुण्यामध्ये ४८ तर मुंबईमध्ये ३६ तर ठाण्यामध्ये ९ उपचाराधीन कोरोना रुग्ण आहेत. मुंबईमध्ये सात नवे रुग्ण आढळेले आहे. गेल्या २४ तासांत मुंबईमध्ये (covid in mumbai) सात नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. पुण्यामध्ये सहा आणि औरंगाबादमध्ये एक नवीन रुग्ण आढळला आहे. तर नागपूर, लातूर आणि अकोल्यामध्येही प्रत्येकी दोन रुग्ण सापड आहे.

ग्रामपंचायतीच्या निकालांचं सेलिब्रेशन करत आहात पण आधी महाराष्ट्रातील गावं कर्नाटकात चाललीत ते पाहा, संजय राऊत

Exit mobile version