वादळाचा फटका बसला हॉटेलला; पाऊस वारा पाहून उडाली लोकांची धांदल

सोशल मीडियावर अनेक व्हिडीओज वायरल होताना दिसतात. सध्या काही दिवसांपूर्वी बिपरजॉय या चक्रीवादळामुळे देशातील काही राज्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. बिपरजॉय वादळाचा अनेक राज्यांना जबरदस्त तडाखा बसला.

वादळाचा फटका बसला हॉटेलला; पाऊस वारा पाहून उडाली लोकांची धांदल

सोशल मीडियावर अनेक व्हिडीओज वायरल होताना दिसतात. सध्या काही दिवसांपूर्वी बिपरजॉय या चक्रीवादळामुळे देशातील काही राज्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. बिपरजॉय वादळाचा अनेक राज्यांना जबरदस्त तडाखा बसला. यामुळे अनेक लोकांचे व निसर्गाचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. म्हणूनच सोशल मीडियावर बिपरजॉय वादळाचे अनेक व्हिडीओ वायरल होताना दिसत आहेत. बिपरजॉय वादळाचे अनेक वायरल झालेले व्हिडीओ फेक (Fake) सुद्धा आहेत. काही दिवसांपासून सोशल मीडियावर वादळांसंबंधित अनेक व्हिडीओ शेअर होत आहेत. अशातच सध्या अजून एका वादळाचा व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये वादळाचा जबरदस्त फटका एका हॉटेलला लागला आहे असे दिसून येते. ज्यावेळी हे वादळ हॉटेल मध्ये शिरलं त्यावेळी लोकांनी स्वतःच्या बचावासाठी काय काय केलं हे या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. या वादळामुळे हवेचा वेग हा भरपूर होता. या हवेच्या वेगामुळे अनेक लोकांना संकटाचा सामना करावा लागला. काही लोकांच्या घरांची छते वाऱ्यांनी उडून गेली. काहींची घरे मोडली.

मागील काही दिवसांपूर्वी हॉटेलमध्ये वादळ घुसल्याच्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे. वादळामुळे या हॉटेलचं बरचसं नुकसान झालं आहे. या हॉटेलमध्ये अनेकजण जेवण करण्यासाठी आली होती. मात्र वादळामुळे या लोकांना संकटाचा सामना करावा लागला. वादळापासून आपला बचाव करण्यासाठी अनेकांनी हॉटेलच्या लोखंडाच्या छताला पकडले आहे. हे प्रचंड वादळ आपल्यामुळे हॉटेलच्या टेबल खुर्च्यांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. मात्र आपला बचाव करण्यासाठी ज्या लोकांनी छताला पकडलं, ती लोक हवेत उडाली.

वादळाचा वेग इतका मोठा होता की हॉटेलचं छत वादळामुळे हवेमध्ये उडालं त्यावेळी त्याला पकडून बसलेली लोकं देखील हवेत उडाली. काही लोक वेळीच सावध झाल्यामुळे त्यांनी ते छत सोडून दिले मात्र काही लोकं छतासोबत हवेत उडाली असे आपल्याला या व्हिडिओद्वारे दिसून येते. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती छत सोडून जमिनीवर पडली. वादळाची तीव्रता इतकी भयानक होती की ते पाहून तुमच्या देखील अंगावर काटा येईल. वादळामुळे संपूर्ण हॉटेलचं नुकसान झालं आहे. हा व्हिडीओ ट्विटर वर शेअर केला गेला आहे. आतापर्यंत या व्हिडिओला ३ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज (Views) मिळाले आहेत. मात्र या वादळाचा बिपरजॉय या वादळाशी काहीही संबंध नाही.

हे ही वाचा:

राज ठाकरे यांचे जातीय व्यवस्थेवर परखड मत!

संजय राऊतांचा मोदी सरकारवर हल्लाबोल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version