देशाचे बळ आणखीन वाढणार, लवकरच भारताकडे येणार घातक ड्रोन!

MQ-9B रीपर्स ड्रोनचे दोन प्रकार आहेत, जे स्काय गार्डियन आणि सी गार्डियन म्हणून ओळखले जातात. भारताच्या तिन्ही सशस्त्र दलांसाठी 'सी गार्डियन' प्रकार खरेदी करण्यात आला आहे.

देशाचे बळ आणखीन वाढणार, लवकरच भारताकडे येणार घातक ड्रोन!

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा पुढच्या आठवड्यात अमेरिका दौरा सुरु होणार आहे. याच दौऱ्यापूर्वी संरक्षण अधिग्रहण परिषदेनं (DAC) गुरुवारी १५ जून रोजी अमेरिकन कंपनी जनरल ऍटोमिक्सकडून प्रीडेटर MQ-9B रीपर (MQ-9B Reaper) हे ड्रोन खरेदी करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. अशा तब्बल ३० ड्रोनची खरेदी भारत अमेरिकेकडून करणार आहे. MQ-9B रीपर हे जगातील सर्वात घातक ड्रोन आहे. भारतीय नौदलाकडे दोन MQ-9B रीपर ड्रोन आधीच भाड्याने आहेत.

चीनच्या सीमेवर सशस्त्र दलांची देखरेख करण्यासाठी तेवढ्या सक्षम उपकरणांची गरज आहे. त्यासाठी अमेरिकेकडून MQ-9B प्रीडेटर ड्रोन खरेदी केले जाणार आहेत. सुमारे तीन अब्ज डॉलर्सचा हा खरेदी करार असून, त्यासाठी संरक्षण मंत्रालयाकडून परवानगी मिळाली आहे, अशी माहिती वृत्तसंस्था पीटीआयनं सूत्रांनुसार दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन (Joe Biden) यांची भेट पुढील आठवड्यात व्हाईट हाऊस (White House) वर होणार आहे. दोन्ही नेत्यांच्या भेटीनंतर ड्रोन खरेदी करण्यासंदर्भातील कराराची घोषणा होण्याची दाट शक्यता आहे.

डीएसीच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत ड्रोन खरेदीच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली आहे.अमेरिकेकडून ड्रोन खरेदी करण्याची इच्छा भारत पूर्वीपासूनच दाखवत आला आहे. मात्र, काही अडचणींमुळे ही ड्रोन डील लांबत गेली आहे. आता पंतप्रधान मोदी वॉशिंग्टन दौऱ्यावर जाणारच आहेत, तर त्यापूर्वी ही डील फायनल व्हावी यासाठी अमेरिकेचं परराष्ट्र खातं, पेंटागॉन (Pentagon) आणि बायडेन सरकार हे मिळून प्रयत्न करत आहेत. अशातच पंतप्रधान मोदी २२ जून रोजी अमेरिका दौऱ्यावर जाणार आहेत. त्यामुळे आता मोदींच्या दौऱ्यावेळीच ड्रोन डील होण्याची शक्यता आहे.

MQ-9B रीपर्स ड्रोनचे दोन प्रकार आहेत, जे स्काय गार्डियन आणि सी गार्डियन म्हणून ओळखले जातात. भारताच्या तिन्ही सशस्त्र दलांसाठी ‘सी गार्डियन’ प्रकार खरेदी करण्यात आला आहे. जनरल अ‍ॅटोमिक्सने बनवलेलं MQ9 हे ड्रोन विशेषतः सागरी युद्धांसाठी वापरलं जातं. क्वाड देशांपैकी भारत वगळता सर्वांकडे हे ड्रोन आहेत. या ड्रोनचं वैशिष्ट म्हणजे, केवळ सर्विलियन्स नाही तर अटॅक करण्यासाठीही या ड्रोनचा वापर करता येतो. सॅटेलाईटने ऑपरेट करता येणारं हे ड्रोन ४५ हजार फूट उंच उडू शकतं. एकदा चार्ज केल्यानंतर तब्बल ३५ तास हे ड्रोन वापरता येऊ शकतं. यासोबतच यात रेडार आणि अत्याधुनिक सेन्सर लावण्यात आले आहेत. या ड्रोनमध्ये मिसाईल आणि गनपावडर सुद्धा ठेवता येते.

हे ही वाचा:

Ajit Pawar यांनी शिंदे-फडणवीस सरकार खडेबोल सुनावले

राशिभविष्य ,१६ जुन २०२३, आजच्या दिवशी तुम्ही मनापासून खर्च कराल.

मिल बैठे तीन यार…!

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version