शिक्षकाने विद्यार्थ्यावर केली अमानुषपणे मारहाण

विद्यार्थ्याने अभ्यास नाही केला तर शिक्षक शिक्षा करतात.एका ठिकाणी क्लासमध्ये मुलगा आभ्यास करत नाही या कारणावरुन कोंचिग क्लासच्या शिक्षकाने त्याला अमानुष मारहाण केली.

शिक्षकाने विद्यार्थ्यावर केली अमानुषपणे मारहाण

शिक्षकाने विद्यार्थ्यावर केली अमानुषपणे मारहाण

विद्यार्थ्याने अभ्यास नाही केला तर शिक्षक शिक्षा करतात.एका ठिकाणी क्लासमध्ये मुलगा आभ्यास करत नाही या कारणावरुन कोंचिग क्लासच्या शिक्षकाने त्याला अमानुष मारहाण केली. शिक्षकाने आधी त्याला लाकडी दांड्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. मारहाण करत असताना लाकडी दांडा तुटला तरीही तो थांबला नाही. विद्यार्थ्यांला जमिनीवर बसवून बुक्क्याने मारहाण करण्यात आली. यावेळी विद्यार्थी ओरडत होता. मला मारु नका, असे वेळोवेळी ओरडत होता. मात्र, तरही शिक्षक थांबला नाही.शिक्षकाने केलेल्या मारहाणीत अखेर तो विद्यार्थी बेशुद्ध पडला. तेव्हाच तो थांबला.

बिहारची राजधानी पटनामधील धनरुआतील वीर ओरियारामधील जया क्लासेस आहेत. तिथेच ही अमानुष घटना घडली आहे. सध्या या विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहेत. या घटनेचा व्हिडिओ सध्या सगळीकडे व्हायरल होत आहे. या व्हिडिओमुळं देशभरातून संताप व्यक्त केला जात आहेकोचिंग क्लासचे संचालक अमरकांत कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार शिक्षकाला बीपीचा त्रास आहे. हाय बीपीचा त्रास असल्याने त्याने विद्यार्थ्याला बेदम मारहाण केली. आम्ही त्या शिक्षकाला क्लासमधून काढून टाकले आहे. तसंच, मुलावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हा प्रकार वर्गातील मुलांच्या देखतच सुरू होता. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्या शिक्षकाविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. ग्रामस्थानी छोटू नावाच्या या शिक्षकाला बेदम मारहाण केली आहे. तसंच, या कोचिंग क्लासमध्ये शिकणारे मुलंही दहशतीखाली आहेत.धनरुआ पोलिस ठाण्याच्या प्रभारीना या व्हायरल व्हिडिओबाबत माहिती मिळाली. या व्हिडिओची तपासणी केल्यानंतर ही घटना शनिवारची असल्याचं स्पष्ट झालं. ज्या शिक्षकाने हे कृत्य केलं आहे तो सध्या फरार आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.

Exit mobile version