आईची प्रार्थना ऐकली शिक्षकाने, ५०० रुपयांचं रूपांतर झालं ५१ लाखात

आईची प्रार्थना ऐकली शिक्षकाने, ५०० रुपयांचं रूपांतर झालं ५१ लाखात

Kerala : आपल्या मुलांची उपासमार होत आहे या गोष्टीने आई चिंतेत होती . काय करायचं हे तिला सुचत न्हवतं. शाळेत मुलांना सोडत असताना आईने नाईलाजाने शिक्षकांकडे पैसे मागितले. शिक्षिकेने त्यांना ५०० रुपये न देता चक्क १००० रुपये दिले. केरळ (Kerala) राज्यातील पलक्कड (palakkad) जिल्ह्यातील ही घटना आहे.

केरळ (Kerala) राज्यातील पलक्कड (palakkad) जिल्ह्यातील ही घटना आहे. त्या महिलेचं नाव सुभ्रदा आहे, त्या महिलेच्या पतीचं निधन ऑगस्ट महिन्यात झालं आहे. घरात खायला काहीचं नसल्यामुळे सुभ्रदा यांनी गिरिजा हरिकुमार या शिक्षिकेकडे मदत मागितली. त्यानंतर शिक्षकांनी त्या महिलेचं स्थिती समजून घेतली. ज्यावेळी सुभद्रा यांनी गिरीजा या शिक्षिकेकडे फक्त ५०० रुपये मागितले होते, त्यांनी सुभ्रदाला १ हजार रुपये दिले. त्यानंतर गिरीजा यांनी सांगितले की, मी काहीतरी करणार आहे. गिरीजा यांनी सुभ्रदा यांच्या घरी भेट दिली. त्यावेळी त्यांच्या घरी काहीचं नसल्याचं लक्षात आलं.

 

शिक्षक गिरीजाने आई सुभ्रदाच्या घरी भेट दिली. घरी गेल्यावर असं निदर्शनास आला कि, घरी खायला काही नाही. घरची परिस्थिती दारिद्र्य रेषेच्या खाली होती. आई सुभद्रा हिच्या पतीच नुकतच निधन झाला होत आणि सगळी जबाबदारी आईवर अली होती . आई ला मुलांसाठी बराच काही कारायच होत . पण परिस्थितीपुढे त्या हतबल होत्या. शिक्षिका गिरीजा यांनी आईची सगळी खटाटोप झालेला मानसिक त्रास समजून घेतला .

त्यानंतर शिक्षिका गिरीजा यांनी सुभ्रदा यांची ही सगळी माहिती सोशल मीडियावर शेअर केली. त्यावर त्यांचा अकाऊंट नंबर सुद्धा शेअर केला . ती माहिती इतकी व्हायरल झाली की, त्यांच्या खात्यावर ५१ लाख रुपये जमा झाले.केरळ (Kerala) राज्यातील पलक्कड (palakkad) जिल्ह्यातील ही घटना आहे. विशेष म्हणजे गिरीजा यांनी त्यांचं राहिलेलं अर्धवट घर पुर्ण करायचं आहे असं लिहिलं होतं. दुसरं म्हणजे त्या मुलाचं शिक्षण त्यांना पुर्ण करायचं आहे असं नमूद केलं होतं.अश्या प्रकारे आईची तळमळ बघून शिक्षिकेने आईची मदत केली. परत एकदा माणुसकी उत्तम उदाहरण हे समोर आले आहे.

हे ही वाचा:

“आदित्य ठाकरे यांची नार्कोटेस्ट करा”

तब्बल १९ वर्षांनंतर चार्ल्स शोभराज तुरुंगातून बाहेर येणार, कोण आहे हा ‘बिकिनी किलर’?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Exit mobile version