शिक्षिकेने वर्गात केला शिव तांडव, वर्गातली मुलेही थिरकली…

हर हर शंभू (har har shambhu ) हे गाणं लोकप्रिय झालं आहे. सोशल मीडिया वर प्रत्येक जण या गाण्यावर थिरकताना दिसतोय. गाण्याचे बोल आपल्याला प्रत्येकाच्या तोंडी ऐकायला मिळतात.

शिक्षिकेने वर्गात केला शिव तांडव, वर्गातली मुलेही थिरकली…

हर हर शंभू (har har shambhu ) हे गाणं लोकप्रिय झालं आहे. सोशल मीडिया वर प्रत्येक जण या गाण्यावर थिरकताना दिसतोय. गाण्याचे बोल आपल्याला प्रत्येकाच्या तोंडी ऐकायला मिळतात. हे गाणं अभिलिप्सा पांडा (Abhilipsa Panda) यांनी गायलेलं आहे. इंटरनेट वर गाणं प्रसिद्ध झालं असून चाहते रील बनवून इंस्टाग्राम पोस्ट शेअर करून गाण्याची मज्जा घेत आहे. या गाण्यासाठी गायिका अभिलिप्सा पांडा हिचे भरपूर कौतुक होत आहे. गाणं कानावर पडताच पाय थिरकू लागतात प्रत्येकाला या गाण्यावर डान्स करायला आवडतो हे सोशल मीडियावरील पोस्ट वरून दिसून येते.

एक शिक्षिकेने हर हर शंभू गाण्यावर केलेला नाच सद्या सोशल मीडिया (soshal media ) वर वायरल झाले आहे. इंटरनेट वर या व्हिडिओला चाहत्यांकडून भरभरून प्रेम मिळतंय. व्हिडिओमध्ये पाहायला मिळतंय कि शिक्षिका हर हर शंभू गाण्यावर नाच करतेय. शाळेतील मुलांना ती नाच शिकवतेय. गोंडस मुले शिक्षिकेच्या मागे डान्स (dance) स्टेप्स करायचा प्रयत्न करताना आपल्याला दिसतायत. वर्गात वार्षिक स्नेहसंमेलनची तयारी चालू असल्याचे भासते. शिक्षिकेचा डान्स सोशल मीडिया वर भन्नाट वायरल झाला असून नेटकर्यांना खूप आवडलाय. हा व्हिडिओ पॉलिटिक्स सॉलिटिक्स नावाच्या फेसबुक पेजवर शेअर करण्यात आला आहे. तसेच या व्हिडिओला १८ लाखहून अधिक लाईक्स (like) मिळाले आहेत .

चाहत्यांनी या व्हिडिओला चांगला प्रतिसाद दिला. चाहते म्हणले हा डान्स खरंच खूप सुंदर आहे. शिक्षिका मुलांना छान डान्स स्टेप्स शिकवत आहेत. एक सोशल मीडिया युझर म्हणतो हे खूप धार्मिक आहे, तर दुसरा म्हणाला हा नाच बघून मला खूप आनंद झाला. एकीकडे भरभरून ऊर्जा देणाऱ्या या गाण्यावर शिक्षिकेनं अगदी कोपेल आणि शांत नृत्य केले आहे. हे नृत्य बघून सर्वांचे डोळे दिपून गेले. तसेच हर हर शंभू गाण्याचे क्रेझ (craz) प्रेक्षकांमध्ये वाढत चालले आहे. कैक लोकांनी हे गाणं आपल्या मोबाइल फोनची रिंगटोन म्हणून ठेवलेले आहेदिवसेंदिवस गाण्याची पसंती वाढत चालली आहे.

हे ही वाचा:

पंतप्रधानांना “हे” शोभत नाही, राज ठाकरेंचा मोदींवर निशाणा

उर्फीचा ‘हा’ फोटो होतोय सोशल मीडियावर व्हायरल, यावेळी अपूर्ण नव्हे तर पूर्ण कपड्यांमुळे होतेय उर्फी होतेय ट्रोल

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
Exit mobile version