spot_img
Tuesday, September 17, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ या योजनेची तांत्रिक अडचण होणार दूर ; राज्यसरकारने केले काही नवे बदल

महाराष्ट्र शासनाने लाडकी बहीण योजना सुरु करण्याची घोषणा केली. या घोषणेनंतर राज्यात ठिकठिकाणी महिलांच्या रांगा लागल्या आहेत.

पावसाळी अधिवेशन (MONSOON SESSION) गुरुवारपासून सुरु झाले आहे. या पावसाळी अधिवेशनात सरकारने २०२४-२५ अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पात अनेक योजनाची घोषणा करण्यात आली. त्यामुळे राज्याचा अर्थसंकल्प (budget) जाहीर करण्यात आला. हा अर्थसंकल्प राज्याचे अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी २८ जून रोजी सादर केला होता.

साधारणतः या अर्थ संकल्पात महिला, शेतकरी व नोकरदार वर्ग अश्या काही मुख्य घटकांवर लक्ष करण्यात आले. सोबतच यात अनेक नवनवीन योजना सांगण्यात आल्या आहेत.ज्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळू शकतो. हे शिनेसरकारचे  शेवटचे बजेट आहे. यात ७६००० कोटी रुपयांचा वाढवण बंदर प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली. या पावसाळी अधिवेशनात हा अर्थसंकल्प जाहीर करण्यात आला होता. यात मुख्यमंत्री ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ जुलै २०२४ रोजी सुरु करण्यात आली आहे. आता याच योजनेत काही नवे बदल करण्यात आले आहेत.

महाराष्ट्र शासनाने लाडकी बहीण योजना सुरु करण्याची घोषणा केली. या घोषणेनंतर राज्यात ठिकठिकाणी महिलांच्या रांगा लागल्या आहेत. अर्थमंत्री अजित पवार यांनी येत्या राखी पौर्णिमेला महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचा लाभ पोहचणार असल्याचे म्हटले आहे. त्यासाठी २.५ कोटी लाभार्थीचा डाटा कसा भरणार ? हा मोठा प्रश्न होता. यासंदर्भातील सर्व्हर वारंवार ठप्प होण्याचे प्रकार घडत आहे. यामुळे आजपासून (१५ जुलै) शासनाने नवीन पद्धत तयार केली आहे. ‘यूआरएल’ पद्धतीने महिलांची खाती उघडली जाणार आहे.

अर्जाची तांत्रिक अडचण आता होणार दूर :

यूआरएल म्हणजे युनिक रिसोर्स लोकेटर प्रणाली आहे. ज्या प्रमाणे आयकरदाते यूआरएलवर स्वत:चे खाते हाताळतात. त्याचप्रमाणे लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिला आपले खाते हाताळू शकणार आहे. राज्यभरातील महिलांना आपला संपूर्ण तपशील यूआरएल खात्यात भरता येणार आहे. यामुळे सर्व्हर ठप्प होण्याच्या तांत्रिक अडचणीवर पर्याय तयार होणार आहे.

अंगणवाडी सेविकांच्या होणार फायदा :

लाडकी बहीण योजनेमुळे अंगणवाडी सेविकेची कमाई होणार आहे. त्यांना एका अर्जामागे ५० रुपये मानधन मिळणार आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबतची घोषणा केली. या योजनेत नाव नोंदवण्यासाठी ऑगस्ट अखेरपर्यंत मुदत आहे. सत्ताधारी आणि विरोधी सर्वच पक्षातील आमदार या योजनेत आपल्या भागातील महिलांची नावे भरुन घेत आहेत. काही आमदारांनी संगणक प्रणालीमार्फत पात्र महिलांच्या याद्या तयार केल्या आहेत.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्य सचिव सुजाता सौनिक स्वत: या योजनेवर लक्ष ठेवून आहेत. योजनेला राज्यभरातील महिलांकडून मोठा प्रतिसादही मिळाला आहे.

हे ही वाचा:

HEAVY RAINFALL : अतिवृष्टीमुळे KONKAN RAILWAY झाली ठप्प ; काही रेल्वेगाड्या रद्द तर काही रेल्वे गाड्यांचे मार्ग वळवले

६० वर्षांवरील जेष्ठांसाठी नवी खुशखबर ; राज्यात ‘मुख्यमंत्री तीर्थयात्रा दर्शन योजना’ होणार लागू

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss