spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

India Coronavirus कोरोनाचा धोका वाढला, आज केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी बोलावली महत्त्वाची बैठक

जगभरात कोरोनाचा (Covid19 Virus) पुन्हा एकदा उद्रेक पाहायला मिळत आहे. चीन (China), ब्राझीलमध्ये (Brazil) पुन्हा एकदा कोरोना संसर्गाचा वेग वाढला आहे.

Coronavirus Outbreak : जगभरात कोरोनाचा (Covid19 Virus) पुन्हा एकदा उद्रेक पाहायला मिळत आहे. चीन (China), ब्राझीलमध्ये (Brazil) पुन्हा एकदा कोरोना संसर्गाचा वेग वाढला आहे. जगभरातील कोरोना प्रादुर्भावाचा वेग पाहता भारत सरकार (Government of India ) अलर्ट झालं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी आज देशातंर्गत कोविड तयारीबाबत महत्त्वाची बैठक बोलावली आहे. त्यामुळे देशात कोरोनासंदर्भात नव्या गाईडलाईन्स किंवा खबरदारीचे उपाय जारी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कोरोनाचं उगम स्थान मानलं जाणाऱ्या चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोना विषाणूने (Covid-19) डोकं वर काढला आहे. चीनमध्ये (China) कोरोनाची परिस्थिती पुन्हा एकदा हाताबाहेर जाताना दिसत आहे. चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा विस्फोट झाला आहे. दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. तर कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्यादेखील वाढली आहे. कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणत वाढल्यामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण निर्माण झाला आहे. कोरोना प्रकरणांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून रुग्णालयामध्ये औषध आणि खांटांचा तुटवडा निर्माण झाला आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, या कोरोना लाटेमध्ये चीनमधील ६० ते ७० टक्के जनता कोरोनाच्या विळख्यात सापडेल असं सांगितलं जात आहे. कोरोनामुळे २० लाख मृत्यू होण्याची शक्यताही आरोग्य तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.

Coronavirus in China चीनमध्ये कोरोनाचा उद्रेक ! व्हिडीओ होतोय व्हायरल

केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी बुधवारी देशातील कोविड-१९ परिस्थितीबाबत वरिष्ठ अधिकारी आणि तज्ज्ञांची बैठक बोलावली आहे. एएनआय वृत्तसंस्थेना दिलेल्या माहितीनुसार, ही बैठक ११:३० वाजता सुरू होईल. या बैठकीमध्ये इतर देशांतील कोविड १९ परिस्थितींचाही आढावा घेण्यात येईल. यानंतर परिस्थिती पाहता नवे निर्बंध लागू होण्याबाबत निर्णय होऊ शकतो.

 देशात सध्या कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आहे. देशातील कोरोना रुग्णसंख्येमध्ये मोठी घट झाली आहे. दररोज नव्याने नोंद होणाऱ्या रुग्णांची संख्यादेखील घटली आहे. देशात काल ११२ नव्या रुग्णांची नोंद झाली होती. काही महिन्यांपूर्वी दैनंदिन कोरोना रुग्णांचा आकडा लाखांवर पोहोचला होता. आतापर्यंत देशात ४ कोटी ४६ लाख ७६ हजार १९९ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामधील ४ कोटीहून अधिक रुग्ण कोरोना संसर्गातून बरे झाले आहेत.

हे ही वाचा : 

मोठी बातमी ! Elon Musk Twitter च्या CEO पदाचा देणार राजीनामा

Maharashtra Assembly Winter Session आज हिवाळी अधिवेशनाचा तिसरा दिवसही गाजणार ?

Follow Us टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss