दुभाजकावर गाढ झोपेत असलेल्या चौघांचा भरधाव ट्रकने चिरडलं

दुभाजकावर गाढ झोपेत असलेल्या चौघांचा भरधाव ट्रकने चिरडलं

बुधवारी पहाटे रस्त्याच्या दुभाजकावर झोपलेल्या लोकांवर भरधाव ट्रकने धडक दिल्याने किमान चार ठार, तर दोन जण गंभीर जखमी झाले. पीडित दुभाजकावर झोपलेले असताना ट्रकने त्यांना चिरडलं. या घटनेनंतर ट्रकचालक फरार झाला आहे. चालकाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी वेगवेगळी पथकं तयार केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सीमापुरी भागात रात्री १ वाजून ५१ मिनिटांच्या सुमारास काही लोक दुभाजकावर झोपलेले असताना भऱधाव वेगात असणाऱ्या अज्ञात ट्रकने त्यांना चिरडलं.

 

दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर एका व्यक्तीला रुग्णालयात आणल्यानंतर मृत घोषित करण्यात आले. प्राथमिक उपचारादरम्यान चौथ्या व्यक्तीचा मृत्यू झाला, असे पोलिस अधिकाऱ्यांनी एएनआयला सांगितले. ५२ वर्षीय करीम (Kareem), २५ वर्षीय छोटे खान (Chote Khan) , ३८ वर्षीय शाह आलम ( Shah Alam)आणि ४५ वर्षीय राहुल (Rahul) अशी चार मृतांची नावे आहेत. दोन जखमींमध्ये १६ वर्षीय मनीष (Manish) आणि ३० वर्षीय प्रदीप (Pradip) यांचा समावेश आहे, अशी माहिती वृत्तसंस्थांनी दिली आहे.

हे ही वाचा:

शरद पवारांवर निशाणा साधत प्रकाश आंबेडकरांचा राष्ट्रवादीवर आरोप, म्हणाले मविआ पाडण्याचा…

Ind vs AUS 1st T20 : ऑस्ट्रेलियाचा भारतावर ४ विकेट राखून मात

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version