संयुक्त राष्ट्रांनी पाकिस्तानचे अब्दुल रहमान मक्की यांना जागतिक दहशतवादी म्हणून केले घोषित

संयुक्त राष्ट्रांनी पाकिस्तानचे अब्दुल रहमान मक्की यांना जागतिक दहशतवादी म्हणून केले घोषित

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद (UNSC) ने सोमवारी रात्री उशिरा पाकिस्तानस्थित दहशतवादी अब्दुल रहमान मक्की याला त्याच्या ISIL (Da’esh) आणि अल-कायदा प्रतिबंध समिती अंतर्गत जागतिक दहशतवादी म्हणून सूचीबद्ध केले. मक्की हा लष्कर-ए-तैयबा (LeT) प्रमुख हाफिज सईदचा मेहुणा आहे, ज्याने ISI आणि पाकिस्तानच्या (Pakistan) डीप स्टेटच्या मदतीने २६/११ च्या मुंबई (Mumbai)हल्ल्याची योजना आखली आणि त्याचे आयोजन केले.

तब्बल तीन वर्षांपासून भारत या प्रयत्नात होता. मात्र, चीन (China) संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत (United Nations Security Council) याला विरोध करत असल्याने हा प्रस्ताव (Proposal ) फेटाळला जात होता. तब्बल ३ वर्ष ८ महिन्यांनी चीन नरमला असून अब्दुल रहमान मक्की (Abdul Rehman Makki) याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यास चीनने मंजूरी दिल्याने पाकिस्तानला धक्का बसला आहे. काल १६ जानेवारी रोजी पुन्हा भारताने संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषद समितीत अल-कायदा (Al-Qaeda) आणि संबंधित दहशतवाद्यांच्या यादीत मक्कीला प्रतिबंधित करण्याचा प्रस्ताव मांडला होता.

अब्दुल रहमान मक्की हा दहशतवादांना आर्थिक रसद पुरवणे, तरुणांना हल्ल्यासाठी प्रवृत्त करणे, भारताविरुद्ध विशेषतः जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) दहशतवादी हल्ले करण्याचा कट रचल्‍याचे यापूर्वीच स्‍पष्‍ट झाले होते. मक्की हा लश्‍कर-ए-तोयबाचा म्‍होरक्‍या आणि मुंबई हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईदचा (Hafiz Saeed) मेहुणा आहे. त्‍याचा अनेक दहशतवादी हल्‍ल्‍यांमध्‍ये सहभाग होता. सईद यांच्‍यानंतर मक्कीकडेच तोयबाची सूत्रे आहेत. तसेच तो पाकिस्‍तानमधील जमाद-उद-दावा राजकीय पक्षाचाही प्रमुख आहे.

हे ही वाचा:

अभिनेत्री ऐश्वर्या रायच्या अडचणीत वाढ, तहसीलदारांने बजावली ‘या’ प्रकरणात थेट नोटीस

अर्जुन खोतकरांच्या जावयावर गुन्हा दाखल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Exit mobile version