व्हिडिओ होतोय तुफान वायरल, आमदार महिलेला पतीने लगावली कानशिलात

पंजाब मध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ट्विटर वरील एका व्हिडिओ पोस्ट मार्फत हा सर्व प्रकार उघडकीस आला आह. आम आदमी पक्षाच्या (आप) ( Aam Aadmi Party ) आमदार बलजिंदर कौर यांचा हा व्हिडीओ आहे.

व्हिडिओ होतोय तुफान वायरल, आमदार महिलेला पतीने लगावली कानशिलात

पंजाब मध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ट्विटर वरील एका व्हिडिओ पोस्ट मार्फत हा सर्व प्रकार उघडकीस आला आह. आम आदमी पक्षाच्या (आप) ( Aam Aadmi Party ) आमदार बलजिंदर कौर यांचा हा व्हिडीओ आहे. आणि सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आम आदमी पक्षाच्या आमदार बलजिंदर कौर (Aam Aadmi Party MLA Baljinder Kaur) यांना त्यांच्या पतीने सर्वांसमोर कानशिलात लगावली आहे. असा तो व्हिडिओ आहे.

नजीकच्या सीसीटीव्हीमध्ये ही घटना कैद झाली आहे आणि सर्व प्रकार उघडकीस आला. व्हिडिओमध्ये आप आमदार बलजिंदर कौर आणि त्यांचे पती यांच्याशिवाय इतर काही लोक उभे आहेत, जे मध्यस्थी करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ १० जुलैचा आहे, जो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून या व्हिडीओची चर्चा देखील मोठ्या प्रमाणावर होत आहे. द ट्रिब्यूनमधील वृत्तानुसार पंजाब महिला आयोगाच्या अध्यक्षा मनीषा गुलाटी यांनी स्वतः या प्रकरणाची दखल घेण्याचे सांगितले आहे. मी सोशल मीडियावर बलजिंदर कौरचा व्हिडीओ पाहिला आहे. समाजाचे प्रश्न मांडणाऱ्या महिलेला तिच्याच घरात हिंसाचार सहन करावा लागत आहे, हे धक्कादायक आहे. असे त्यांनी म्हंटले आहे.

या व्हायरल व्हिडिओमध्ये आम आदमी पार्टीच्या आमदार बलजिंदर कौर आणि त्यांचे पती यांच्यात काही मुद्द्यावरून वाद होत आहे. वाद वाढल्यावर आमदार पती सुखराज यांनी तिला सर्वांसमोर कानाखाली मारली आहे. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. बलजिंदर कौर पंजाबच्या तलवंडी साबोच्या आमदार आहेत. पंजाब विधानसभा निवडणुकीत ते पुन्हा याच जागेवरून विजयी झाल्या.

आप आमदार बलजिंदर कौर यांच्यासोबत झालेल्या घटनेचा व्हिडीओ पंजाब युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष बरिंदर यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. ट्विट करताना बरिंदर यांनी व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, आमदार बलजिंदर कौर यांना दिवसाढवळ्या कानशिलात मारण्यात आली हे आश्चर्यचकित करणारे आहे. पुरुषांची मानसिकता बदलावी लागेल. इतर काहीही बदलण्या आधी ही पुरुषप्रधान वृत्ती बदलली पाहिजे.

हे ही वाचा:

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरे यांच्या निवासस्थानी दाखल

भविष्यातील आव्हानांना भारताचं उत्तर म्हणजे विक्रांत – नरेंद्र मोदी

भारतीय नौदलालाचा नवा झेंडा छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version