Scooby – Do मधील वेल्मा समलैंगिक दाखवताच अशा नेटकऱ्यांनी दिल्या या प्रतिक्रिया

या फ्रँचायझीच्या चाहत्यांनी खूप आधीच वेल्मा समलैंगिक असल्याचा अंदाज लावला होता. मात्र या गोष्टीच्या पुष्टीनंतर ते अधिकच खुश झाले आहेत.

Scooby – Do मधील वेल्मा समलैंगिक दाखवताच अशा नेटकऱ्यांनी दिल्या या प्रतिक्रिया

गेल्या कित्येक वर्षांच्या तर्क-वितर्कानंतर अखेरीस सुप्रसिद्ध सिरीज ‘स्कुबी डुबी डू’मधील वेल्मा हे पात्र समलैंगिक असल्याचं सिद्ध झालं आहे. या सिरीजमधील “ट्रिक वर ट्रीट स्कुबी डू’ हा चित्रपट या आठवड्याच्या सुरुवातीला डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. या चित्रपटात वेल्माचे कोको डायब्लोवर क्रश असल्याचे दाखवले आहे. या चित्रपटात कोको डायब्लो ही खलनायकी पोशाख डिझायनर दाखवण्यात आली आहे.

एका व्हायरल क्लिप मध्ये वेल्मा कोको डायब्लो तिला आवडत असल्याचे सांगताना दिसत आहे. या क्लिपमध्ये कोकोला पाहताच वेल्मा तिला वाटत असलेल्या लाजेमुळे लाल होताना दिसत आहे आणि त्यात वेल्मा मी काय करू? मला ती खूप आवडते, असंही म्हणताना दिसत आहे.

स्कूबी डू’ मधील ही हौशी गुप्तहेरांची टोळी १९६९ पासून अनेक रहस्ये सोडवत आहे आणि अनेक पिढ्यांना आनंद देत आहे.

वेल्मा समलैंगिक असल्याची पुष्टी झाल्यानंतर गुगलनेही एक खास फिचर तयार केले आहे. या फीचरनुसार गुगलवर Velma संबंधित शब्द शोधल्यास स्क्रीनवर प्राईड फ्लॅग आणि कॉन्फेटी दिसतात. वेल्मा आपल्या भावना काबुल करत असल्याची ही क्लिप सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली आहे. स्कूबी डू फ्रँचायझीच्या अनेक चाहत्यांनी यासंबंधी अनेक ट्विट केले आहेत. या फ्रँचायझीच्या चाहत्यांनी खूप आधीच वेल्मा समलैंगिक असल्याचा अंदाज लावला होता. मात्र या गोष्टीच्या पुष्टीनंतर ते अधिकच खुश झाले आहेत.

पाहुया नेटकऱ्यांनी यावर काय प्रतिक्रिया दिल्यात:

हे ही वाचा:

बॅालीवूडलाही ‘महासत्तांतर’ची भुरळ, राम गोपाल वर्मा अॅक्शन मोडमध्ये

Lal Singh Chadhdha: आमिर खानचा लाल सिंग चढ्ढा होणार OTT वर रिलीज, जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येणार चित्रपट

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version