या भारतीय शहरांमध्ये प्रथम सुरू करण्यात येणार 5G सेवा

देशभरात 12 ऑक्टोबरपर्यंत 5G सेवा सुरु करण्यात येणार आहे

या भारतीय शहरांमध्ये प्रथम सुरू करण्यात येणार 5G सेवा

5G

भारतात लवकरात लवकर 5G सेवा सुरू होणार आहे. रिलायन्स जिओ आणि एअरटेल या दोन मोठ्या टेलिकॉम कंपन्या या महिन्याच्या अखेरीस भारतात त्यांची 5G सेवा सुरू करण्याच्या शक्यता आहेत. तर केंद्रीय तंत्रज्ञान आणि दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबतच उत्तर दिलं आहे. देशभरात 12 ऑक्टोबरपर्यंत 5G सेवा सुरु करण्यात येणार आहे, असे अश्विनी वैष्णव यांनी गुरुवारी सांगितलं. 5G सेवा सुरु झाल्यानंतर त्याचा देशभरात टप्या टप्यानं विस्तार करण्यात येणार आहे, असेही वैष्णव म्हणाले.

भारत सरकार 29 सप्टेंबर रोजी इंडिया मोबाइल काँग्रेस (IMC) च्या उद्घाटनप्रसंगी अधिकृतपणे 5G लाँच करेल अशा चर्चा सुरु असताना. 5G सेवा सुरु करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. दूरसंचार ऑपरेटर त्या दृष्टीने काम करत आहेत. इन्स्टॉलेशनचं काम पूर्ण झालं आहे. 12 ऑक्टोबरपर्यंत 5G सेवा सुरु होईल, असा अंदाज आहे. त्यानंतर टप्या टप्यानं शहरी आणि ग्रामीण भागामध्ये 5G सेवाचा विस्तार करण्यात येईल. 5G सेवा सर्वसामान्यांनाही परवडणाऱ्या किमतीमध्ये असेल, याची काळजी घेणार आहोत, असे अश्विनी वैष्णव म्हणाले.

भारतातील टेलिकॉम क्षेत्रात आगामी काळात मोठे बदल घडणार आहेत. केंद्र सरकारकडून यासाठी प्रयत्न सुरु आहेत. भारतीय टेलिकॉम क्षेत्राला जागतिक पातळीवर जोडण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. भारतील टेलिकॉम क्षेत्राचा ग्लोबल बेंचमार्कसोबत ताळमेळ बसवण्यासाठी सरकारचा प्रयत्न असल्याचं अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं
एका अहवालानुसार 5G सेवा टप्प्याटप्प्याने सुरू होईल. पहिल्या टप्प्यात केवळ 13 निवडक शहरांना जलद-गती इंटरनेट सेवा मिळणार आहे. कोणती शहरे प्रथम 5G सेवा सुरू करणार आहेत.

आता, याचा अर्थ या शहरांमध्ये राहणार्‍या प्रत्येकाला 5G सेवा पहिल्यांदा सुरू केल्यावर त्यामध्ये प्रवेश मिळेल का? या शहरांतील निवडक भागात टेलकोस 5G वर प्रवेश देऊ शकतील अशी शक्यता नाही. या शहरांमध्येही, 5G सर्वांपर्यंत पोहोचण्यास बराच वेळ लागू शकतो, असे अहवालात नमूद केले आहे.

हे ही वाचा:

सोनाली फोगटच्या पोस्टमॉर्टम अहवालात शरीरावर अनेक जखमा

पन्हाळा हिल हाफ मॅरेथॉन यावर्षी 28 ऑगस्ट रोजी होणार

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version