spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

चीनमध्ये सरकारच्या विरोधात ‘या’ भारतीय गाण्याचा होतोय वापर

भारतीय चित्रपटांची लोकप्रियता संपूर्ण जगभरात वाढत आहे , सध्याच्या काळात तर भारतीय चित्रपटांना आणि चित्रपटांमधील गाण्यांना जगभरातून प्रेक्षकांचे भरपूर प्रेम मिळत आहेत.मागे तर नागराज मंजुळेंचा सैराट चित्रपट दुबई व अमेरिकेतील चित्रपटगृहात चालू असताना तेथील नागरिकांनी झिंग झिंग झिंगट गाण्यावर चित्रपटगृहातच उत्साहाने नाचायला सुरुवात केली . तर ‘आरआरआर’ चित्रपटातील कलाकार जपानला जाऊन आले आहेत. जपानमध्ये दाक्षिणात्य कलाकारांचे अनेक चाहते आहेत. दुबई , जपान , अमेरिकेप्रमाणेच चीनमध्येदेखील भारतीय चित्रपटांचे चाहते आहेत. आमिर खान या अभिनेत्याचे चित्रपट चीनमध्ये मोठ्या प्रमाणावर बघितले जातात. सध्या चीनमध्ये दिवंगत संगीतकार बप्पी लहरी यांचे एक गाणे सध्या चीनमध्ये चांगलेच चर्चेत आले आहे.

चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्या ‘झिरो कोव्हीड’ धोरणावरून लोकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. अनेकजण आपल्या घरात अडकून पडले आहेत. चीनने अनेक विमानांचं उड्डाण रद्द केलं असून काही ठिकाणी शाळादेखील बंद केल्या आहेत. अनेक ठिकाणी लॉकडाउनही लावण्यात आले आहे.

८० च्या दशकात ‘डिस्को डान्स’र चित्रपटातील ‘जिमी जिमी’ हे गाणे सध्या चीनमध्ये व्हायरल होत आहे. या गाण्याने ८० च्या दशकात भारतात धुमाकूळ घातला होता. तब्बल ४ दशकानंतर या गाण्याचे चीनमधील लोकांना वेड लागले आहे . या गाण्याची लोकप्रियता इतकी वाढली की जपानच्या ‘यु डोन्ट मेस विथ जोहान’ या चित्रपटात हे गाणे वापरले होते. माया अरुलप्रगासम या श्रीलंकेच्या संगीतकाराने हे गाणे आपल्या पद्धतीने २००७ साली प्रदर्शित केले होते. .

चीनमध्ये या गाण्याचे वेड लागण्याचे कारण म्हणजे चिनी सरकारच्या झिरो कोव्हीड धोरणामुळे लागलेय या लॉकडाउनचा निषेध करण्यासाठी लोक ८० च्या दशकात ‘डिस्को डान्स’र या भारतीय चित्रपटातील ‘जिमी जिमी’ या गाण्याचा वापर करत आहेत. या गाण्यातील जे शब्द आहेत ‘जिमी जिमी’ याचा मँडरिन भाषेत अर्थ निघतो ‘तांदूळ द्या तांदूळ द्या’, लोक व्हिडीओमधून घरातील रिकामे भांडे दाखवत मागे हे गाणे लावताना दिसून येत आहेत. हे व्हिडीओ टिकटॉकसारखे असणाऱ्या डौयिन या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत आहेत.

हे ही वाचा :

कार शिकवणे जीवावर बेतले, ब्रेक देण्याऐवजी एक्सलेटरवर पाय ठेवला दुर्घटनेत तिघांचा मृत्यू

Andheri Election : अंधेरी पूर्व मतदारसंघात ३ वाजेपर्यंत २२.८५ टक्के मतदान, सात उमेदवार रिंगणात कोणाचा होणार विजय?

आमच्या ताई सुषमा अंधारेंनी भावाबद्दल चांगलं वक्तव्य केलं त्यासाठी मी त्यांचा मनापासून आभारी; संजय शिरसाट

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss