Thursday, July 4, 2024

Latest Posts

हाच तो दिवस.. जेव्हा आपला महाराष्ट्र “कृषी प्रधान” झाला !

महाराष्ट्र राज्याचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेले वसंतराव नाईक(Vasantrao Naik) यांचा या मध्ये अधिक मोलाचा वाटा आहे. वसंतराव चव्हाण(Vasantrao Chavan), शंकरराव चव्हाण(Shankarrao Chavan), वसंतदादा पाटील (Vasantdada patil), यांच्यासोबत महाराष्ट्र घडवणारे मुख्यमंत्री म्हणून लाभलेले वसंतराव नाईक (Vasantrao Naik) यांच्या नावाचा प्रामुख्याने उल्लेख केला जातो. 

“इडा पीडा टळो आणि बळीचं राज्य येवो” असं म्हणताच डोळ्यासमोर उभा राहतो तो आपल्या शेतात राबत असणारा शेतकरी आणि बैलजोडी साथीला.. खरं तरं आज जागतिक कृषी दिन. दरवर्षी १ जुलै रोजी जागतिक कृषी दिवस साजरा केला जातो. महाराष्ट्र राज्याचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेले वसंतराव नाईक(Vasantrao Naik) यांचा या मध्ये अधिक मोलाचा वाटा आहे. वसंतराव चव्हाण(Vasantrao Chavan), शंकरराव चव्हाण(Shankarrao Chavan), वसंतदादा पाटील (Vasantdada patil), यांच्यासोबत महाराष्ट्र घडवणारे मुख्यमंत्री म्हणून लाभलेले वसंतराव नाईक (Vasantrao Naik) यांच्या नावाचा प्रामुख्याने उल्लेख केला जातो.

१ जुलै १९१३ हा दिवस सोनेरी पानावर सुर्वण शब्दात कोरला गेलेला असा सुंदर दिवस…कारण त्या दिवशी महाराष्ट्रात शेतकऱ्यांचा बुलंद आवाज असलेला हिरा जन्माला आला तो म्हणजे वसंतराव फुलसिंग नाईक (Vasantrao Fulsingh Naik) यांचा जन्म यवतमाळ जिल्ह्यातील गहुली या गावी १ जुलै १९१३ रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण पोहरादेवी आणि अनेक गावात झाले. १९३८ साली नागपुरच्या मॉरिस महाविद्यालयातून बी.ए. ही पदवी संपादीत केली तर १९४० साली एल.एल.बी. ही पदवी मिळविली. शिक्षण घेत असताना महात्मा ज्योतिबा फुले(Mahatma Jyotiba phule) यांच्या विचाराची छाप पडली आणि त्यांनी विद्यार्थी वयातच राजकारणात पाऊल टाकण्याचा निर्णय घेतला. नागपूर मध्ये शिक्षण घेत असताना त्यांनी आंतरजातीय विवाह केला. त्यांना तीन आपत्य झाली. अरुंधती, अविनाश आणि निरंजन..

वसंतराव नाईक यांची राजकीय कारकीर्द 

१९४१ साली झालेल्या महात्मा गांधी(Mahatma gandhi) यांच्या ‘चले जावो’या आंदोलनात त्यांनी सहभाग नोंदवला. आंदोलनानंतर त्यांनी कॉंग्रेस पक्षात प्रवेश करत राजकारणाला खऱ्या अर्थाने सुरुवात केली.वसंतराव नाईक यांचा जनसंपर्क दांडगा असल्याने त्यांची पुसद तालुकाध्यक्ष म्हणून निवड झाली. त्यावेळी त्यांनी अनेक गावातील रस्त्यांच्या विकासाला चालना दिली. तालुकाध्यक्ष पदाचा कार्यकाळ सुरु असताना १९४६ मध्ये त्यांची नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदी निवड झाली. आपल्या कार्यकाळात त्यांनी संपूर्ण शहराचा चेहरा मोहराच बदलून टाकला. लहान बालकांच्या शिक्षणापासून ते शेतकऱ्यांसाठी धान्याला योग्य भाव मिळवून देण्यापर्यंतच काम त्यांनी केलं. १९५२ मध्ये झालेल्या पहिल्या सार्वत्रिक विधानसभा निवडणूकीत ते आमदार झाले.

१९५६ साली त्यांना पहिल्यांदा मध्यप्रदेशात राजस्व उपमंत्री म्हणून जबाबदारी मिळाली. १९५७ साली पुसद शहरात पहिल्यांदा वीज आली ती वसंतराव नाईक (Vasantrao Naik) यांच्या प्रयत्नानानेच.. आणि त्यानंतर १९५७ ते १९६० या काळात कृषीमंत्री म्हणून कार्य केले. त्यावेळी कृषीविषयक अभ्यासासाठी ते चीन,जपान, सिंगापूर असे विदेशी दौरे केले. अभ्यासकरुन शेती वाणांची महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना ओळख करून दिली आणि त्यांच्या प्रयत्नाने ‘कापूस’हे नगदी पिक शेतकऱ्यांच्या हाती दिले. तेव्हापासून शेतकऱ्यांकडे नगदी पैसा येऊ लागला आणि महाराष्ट्रात सहकारी उद्योगाचे जाळे पसरले. आपल्या देशात पहिल्यांदा रोजगार हमी योजना राबवण्याचे धाडस वसंतराव नाईक (Vasantrao Naik) यांनी केले आहे.

१८ ऑगस्ट १९७९ काळाने केला घात 

१९७९ या काळात त्यांनी शेती विषयक अनेक योजना महाराष्ट्रात राबवल्या.त्यांच्या शेतीविषयक कामाची दखल म्हणून  तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी (Indhira gandhi) यांनी रोजगार हमी योजना देशभरात राबवली. १८ ऑगस्ट १९७९ हा दिवस सोन्यासारखा उजळताच त्याला ग्रहण लागले आणि शेतकऱ्यांसाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या कर्मवीराचे आकस्मित निधन झाले. अवघा कृषीप्रधान महाराष्ट्र हा पोरका झाला आणि तेव्हापासून वसंतराव नाईक यांच्या स्मरणाप्रित्यर्थ दरवर्षी १ जुलै हा दिवस महाराष्ट्रात “कृषिदिन” म्हणून साजरा केला जातो.

हे ही वाचा:

MAHARASHTRA ASSEMBLY MONSOON SESSION 2024 : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेवर आमदार सत्यजित तांबे यांनी उठवला आवाज

MPCB ने केली वारकऱ्यांसाठी मोठी घोषणा ; आता इंद्रायणी प्रदूषण मुक्त होणार

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss