Sunday, June 30, 2024

Latest Posts

ITR फाईल करण्याची ‘ही’ शेवटची तारीख..

आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी विलंब शुल्काशिवाय प्राप्तिकर रिटर्न (ITR) भरण्याची अंतिम तारीख ३१ जुलै २०२४ आहे. परंतु, रिटर्न भरण्यापूर्वी त्याची तयारी करणं गरजेच आहे. यासाठी तुम्हाला आयटीआरशी संबंधित कागदपत्राची यादी तयार करावी लागेल पण तुम्हाला माहितीये का यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत? आणि तुम्हाला त्याची गरज का आहे.

आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी विलंब शुल्काशिवाय प्राप्तिकर रिटर्न (ITR) भरण्याची अंतिम तारीख ३१ जुलै २०२४ आहे. परंतु, रिटर्न भरण्यापूर्वी त्याची तयारी करणं गरजेच आहे. यासाठी तुम्हाला आयटीआरशी संबंधित कागदपत्राची यादी तयार करावी लागेल पण तुम्हाला माहितीये का यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत? आणि तुम्हाला त्याची गरज का आहे.

परंतु, रिटर्न भरण्यापूर्वी त्याची तयारी करणं गरजेच आहे. यासाठी काही आयटीआरशी संबंधित कागदपत्राची यादी तयार करावी लागते. यासाठीची कागदपत्रे आवश्यक आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आयटीआरची कागदपत्रं वेगवेगळ्या करदात्यांसाठी वेगवेगळी असतात. यामध्ये उत्पन्न आणि गुंतवणूक वेगवेगळी असते. परताव्यासाठी लागणारी कागदपत्रं ३ भागांत विभागली जातात. ते पुढील प्रमाणे –

  • इन्कम अँड इनव्हेस्टमेंट प्रूफ (Income And Investment Proof):

आयटीआर भरताना तुम्हाला एका आर्थिक वर्षात किती उत्पन्न मिळाले आहे आणि कुठे गुंतवणूक केली आहे, हे सांगावं लागतं.आयकर कायद्याच्या कलम ८० सी मध्ये समाविष्ट असलेल्या टॅक्स सेव्हिंग टूल्स जसे की एफडी, ईएलएसएस इत्यादींमध्ये गुंतवणूक केली असेल तर त्यांच्याशी संबंधित कागदपत्रे तयार ठेवा. जर तुम्ही गृहकर्ज घेतले असेल तर येथे कर सवलतही मिळते. तुम्ही मूळ रकमेवर भरलेल्या व्याजावर टॅक्स डिडक्शनचा दावा करू शकता आणि त्यासाठी तुम्हाला होम लोन स्टेटमेंट दाखवावं लागेल, तुम्हाला भाड्याद्वारे उत्पन्न आलं तर ते जाहीर करावं. जर तुम्ही भाड्यानं राहत असाल तर तुमच्या घरमालकाकडून बिलाची पावती नक्की घ्या. यामुळे तुमचा टॅक्स वाचू शकतो. आपल्याला ही कागदपत्रे जोडण्याची आवश्यकता नाही. शिवाय शेअर्स, सिक्युरिटी किंवा प्रॉपर्टी विकून पैसे कमावले असतील तर त्याचा खुलासा करावा लागेल आणि त्यासाठी तुम्हाला नोकर स्टेटमेंट, प्रॉपर्टी सेल डीड वगैरे द्यावं लागेल. जर तुम्ही डिव्हिडंडमधून कमाई केली असेल तर तुम्ही ते डिमॅट अकाऊट स्टेटमेंटद्वारे दाखवू शकता.

  • टॅक्स स्टेटमेंट (Tax Statement) : 

आता फॉर्म १६ बद्दल जाणून घेऊ पगारदार कर्मचारी याची विशेष वाट पाहत आहेत त्याच्या बाबतीत, कंपनी पगार आणि टीडीएस कपातीचा तपशील जारी करते यात दोन भाग आहेत ए आणि बी, भाग ए मध्ये किती कर कापला जातो, त्याचप्रमाणे नियोक्त्याच पॅन आणि टॅन कार्य आहे यांची माहिती असते. भाग बी मध्ये ग्रॉस सॅलरी ब्रेकअप एक्झम्पशन इत्यादींचा तपशील असतो. वेतन, व्याज आर्दीचा उल्लेख फॉर्म १६ ए मध्ये असतो. त्याचबरोबर जर तुम्ही प्रॉपर्टी विकत घेत असल्याचा तपशील महत्वपूर्ण ठरतो. खरेदीदार तुम्हाला फॉर्म १६ बी देतो फॉर्म १६ सी मध्ये भाड्यावरील टीडीएस कपातीचा तपशील असतो.

  • पर्सनल डीटेल्स (Personal Details) :

पॅन कार्ड बंधनकारक असते. आयकर विभागाकडून पॅन जारी केलं जात हा सर्वात महत्त्वाचा दस्तऐवज आहे. पॅन कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक असणं. आवश्यक आहे. आधार कार्ड लिंक केल्यास रिटर्न भरणं सोपं जातं. आयटी कायद्याच्या कलम १३९ एए नुसार करद्राव्याना आयटीआर भरताना आधार क्रमांक देणं बंधनकारक आहे. आयटीआर फाइलिंगसाठी तुमच्या बैंक खात्याचा सर्व तपशील द्यावा लागतो. बैंकचे नाव, खाते क्रमांक, आयएफएससी आणि तुमची किती खाती आहेत. या सर्वांचा उल्लेख करावा लागतो तुम्हाला कोणत्या खात्यात टॅक्स रिफंड हवा आहे, हेही सांगावं लागेल. तसंच तुम्हाला बैंक स्टेटमेंट किंवा पासबुकची प्रत द्यावी लागेल, जेणेकरून तुम्ही एका आर्थिक वर्षात बचत खात्यावरील व्याजातून किती कमाई केली हे तपासता येतं.

देय तारखेनंतर रिटर्न भरणाऱ्या करदात्यांना कलम २३४ अ अंतर्गत व्याज आणि कलम २३४ F अंतर्गत दंड भरावा लागणार आहे. त्याची मांडणी पुढीलप्रमाणे केली आहे. 

  • एका आर्थिक वर्षात ५० लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेले ज्येष्ठ नागरिक ITR-१ फॉर्म वापरून आयकर दाखल करू शकतात.
  • मालमत्ता, इतर स्रोत किंवा भांडवली नफ्यातून उत्पन्न कमावणारे ज्येष्ठ नागरिक ITR-२ फॉर्मची निवड करू शकतात.
  • व्यवसायातून उत्पन्न मिळवणाऱ्या व्यावसायिक किंवा पेन्शनधारक ITR-३ किंवा ITR-४ फॉर्म चा वापर करून कर रिटर्न भरू शकतील.

वेळेपूर्वी आयटीआर दाखल करण्याचे हे काही विशेष फायदे :

● आवश्यक कागदपत्रे आणि माहिती गोळा करण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो.
● पडताळणी आणि चुका सुधारण्यासाठी अधिक वेळ लागत नाही.
● उशीरा आयटीआर फाइलिंग दंड टाळता येतो.
● तुम्ही कर परताव्यासाठी पात्र असल्यास जलद आयकर परतावा मिळतो.
● छाननी झाल्यास आयकर विभागाकडून नोटीस मिळण्याची शक्यता नाही.

हे ही वाचा

महिलांसाठी खुशखबर ! राज्यात येणार ‘ही’ नवी योजना.. 

चोपडा बस स्थानकाने पटकावला स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानाचा किताब..

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss