तब्बल १३ तासांसाठी व्होडाफोन-आयडियाची ही सेवा राहणार बंद

Vodafone-Idea ही देशातील तिसरी सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. तुम्ही जर Vodafone Idea चे प्रीपेड ग्राहक असाल तर ही त्रासदायक बातमी फक्त तुमच्यासाठी आहे.

तब्बल १३ तासांसाठी व्होडाफोन-आयडियाची ही सेवा राहणार बंद

Vodafone-Idea ही देशातील तिसरी सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. तुम्ही जर Vodafone Idea चे प्रीपेड ग्राहक असाल तर ही त्रासदायक बातमी फक्त तुमच्यासाठी आहे. कंपनी आधीच मोठ्या कर्जाखाली दबली आहे. आता कंपनीने आपल्या प्रीपेड ग्राहकांसाठी अलर्ट जारी केला आहे. Vodafone Idea ने आपल्या प्रीपेड ग्राहकांना सांगितले आहे की कंपनीची प्रीपेड रिचार्ज सेवा १३ तासांसाठी बंद राहणार आहे. म्हणजेच दि २२ जानेवारी रोजी रात्री ८ वाजल्यापासून ही सेवा बंद राहणार आहे. या दरम्यान ग्राहक फोन रिचार्ज करू शकणार नाहीत.अशा परिस्थितीत, ज्यांचे पॅक दरम्यानच्या काळात संपत आहे, त्यांना आगाऊ रिचार्ज करावे लागेल.

Vodafone Idea ने आपल्या ग्राहकांना संदेश पाठवला आहे. त्या पाठवलेल्या संदेशात म्हटले आहे की, कंपनीची प्रीपेड रिचार्ज सुविधा दि. २२ जानेवारी रोजी रात्री ८. ०० ते २३ जानेवारी रोजी सकाळी ९. ३० पर्यंत बंद राहील. कंपनीने म्हटले आहे की ग्राहकांचा अनुभव अधिक सुधारण्यासाठी ते आपली प्रणाली अपग्रेड करत आहे. त्यामुळे १३ तास रिचार्ज सुविधा बंद आहेत.

व्होडाफोन आयडिया हि कंपनी सतत संकटातून जात आहे. व्होडाफोन आयडियाचे टॉवर सेवा प्रदात्यावर कर्ज आहे. याशिवाय कंपनीला रोख रकमेचाही सामना करावा लागत आहे. कंपनीने आधीच फारच कमी 5G स्पेक्ट्रम विकत घेतले आहे, तर Jio आणि Airtel वेगाने 5G सेवा सुरू करत आहेत, तर Vodafone अजून 5G सेवा सुरू करू शकलेली नाही. यासोबतच कंपनीचे ग्राहकही वेगाने बाहेर पडत आहेत. ऑक्टोबरमध्ये कंपनीच्या ग्राहकांच्या संख्येत ३.५ दशलक्षची घट झाली आहे.

व्होडाफोन आयडियाची आर्थिक स्थिती आधीच बिकट आहे. त्याचबरोबर कंपनीने या महिन्यात परवाना शुल्क भरण्यात कसूर केली आहे. कंपनीने परवाना शुल्क सरकारला भरलेले नाही. त्यामुळे कंपनीचा परवाना रद्द होण्याची शक्यता बळावली आहे. कंपनीला परवाना शुल्क म्हणून ७८० कोटी रुपये भरायचे होते, परंतु कंपनी केवळ १० टक्के म्हणजेच ७८ कोटी रुपये भरू शकली आहे.

हे ही वाचा:

निवडणूक कोणतीही असो नियोजन करून आपणच जिंकणार, मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण

पीएम मोदींवरील बीबीसी डॉक्युमेंट्रीवर सरकारची बंदी, यूट्यूब-ट्विटर ब्लॉक करण्याचे दिले आदेश

ज्येष्ठ रंगकर्मी अंबर कोठारे यांचे वृद्धापकाळाने निधन, महेश कोठारेंना पितृशोक

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version