जन्माष्टमी साजरी करण्यसाठी जाणून घ्या शुभ मुहूर्त, ‘या’ वेळेत करा पूजा

जन्माष्टमी साजरी करण्यसाठी जाणून घ्या शुभ मुहूर्त, ‘या’ वेळेत करा पूजा

हिंदू दिनदर्शिकेनुसार जन्माष्टमी (Janmashtami) हा सण कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला साजरा करण्यात येतो. या दिवशी मध्यरात्री रोहिणी नक्षत्रात भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला. अशी पौराणिक समज आहे. त्यामुळे या दिवशी भगवान श्रीकृष्णाच्या बालस्वरूपाची पूजा करण्याचा प्रथा आहे. यंदाच्या वर्षी जन्माष्टमीला ध्रुव आणि वृद्धी योगाचाही योगायोग होत आहे. या योगात केलेली उपासना फलदायी ठरेल. यंदा श्रीकृष्णाचा जन्मदिवस 18 ऑगस्टला आहे की 19 ऑगस्टला याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम आहेत. तर जाणून घ्या जन्माष्टमी कधी साजरी होणार आणि पूजेसाठी कोणता शुभ मुहूर्त आहे.

श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त द्या हटके शुभेच्छा..

कृष्णभक्त भाद्रपदाची अष्टमी तिथी 18 ऑगस्ट रोजी रात्री 9.20 वाजता सुरु होणार असून 19 ऑगस्टला रात्री 10.59 वाजता समाप्त होणार आहे. व श्रीकृष्णाचा जन्म मध्यरात्री झाल्यामुळे 18 ऑगस्टच्या रात्री जन्माष्टमी साजरी करायची आहे. विशेष म्हणजे या दिवशी ध्रुव आणि वृद्धी योग असून हे दोन्ही योग अतिशय शुभ मानले जातात. आपल्या लाडक्या बाळगोपाळला (Janmashtami) प्रसन्न करण्याचा शुभ मुहूर्त 18 ऑगस्टच्या रात्री 12.03 ते 12.47 पर्यंत आहे.

बाल गोपाळला हे नैवेद्य दाखवून प्रसन्न करा

जन्माष्टमीला श्रीकृष्णाला विशेष भोग अर्पण केला जातो. या दिवशी मंदिरांमध्ये श्रीकृष्णाच्या 56 पदार्थ तयार केले जातात. पण काही गोष्टी अशा आहेत ज्या भगवान श्रीकृष्णाला (Janmashtami) खूप प्रिय आहेत आणि या वस्तू श्रीकृष्णाला अर्पण केल्याने कान्हा प्रसन्न होतो. जन्माष्टमीला श्रीकृष्णाला माखण-मिश्री, धने पंजिरी, माखणा पाग, काकडी, पंचामृत, लाडू, पेढे, खीर इत्यादी वस्तू अर्पण करा.

जन्माष्टमीच्या दिवशी कृष्णाच्या पूजेमध्ये या पदार्थांचा समावेश करणे आवश्यक आहे, संपूर्ण यादी लक्षात ठेवा

Exit mobile version