Titanic Submarine, बेपत्ता पाणबुडी अखेर सापडली! परंतु अवशेष पाहायला गेलेल्या ५ ही जणांचा मृत्यू…

नौदलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाणबुडीचा काही दिवसांपूर्वीच स्फोट झाला असल्याचं आढळून आलं आहे. पाणबुडीच्या स्फोटात ५ ही प्रवाशांचा मृत्यू झाल्याचं म्हटलं जात आहे.

Titanic Submarine, बेपत्ता पाणबुडी अखेर सापडली! परंतु अवशेष पाहायला गेलेल्या ५ ही जणांचा मृत्यू…

टायटॅनिकचे (Titanic) अवशेष पाहण्यासाठी गेलेल्या बेपत्ता पाणबुडीबाबत अत्यंत वाईट बातमी समोर आली आहे. नौदलाला बेपत्ता टायटन पाणबुडीचे अवशेष सापडले आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, अमेरिकन कोस्ट गार्ड अधिकाऱ्यांना टायटॅनिक जहाजाजवळ टायटन पाणबुडीचे काही अवशेष सापडले आहेत. नौदलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाणबुडीचा काही दिवसांपूर्वीच स्फोट झाला असल्याचं आढळून आलं आहे. पाणबुडीच्या स्फोटात ५ ही प्रवाशांचा मृत्यू झाल्याचं म्हटलं जात आहे.

टायटन पाणबुडीतील ५ ही जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. याला दुजोरा देत पाणबुडी चालवणारी कंपनी ओशनगेटने श्रद्धांजली वाहिली आहे. पाणबुडीतील सर्व लोक बुडालेल्या टायटॅनिक जहाजाचे अवशेष पाहण्यासाठी खोल समुद्रात गेले, तिथे त्यांचा संपर्क तुटला. १८ जून रोजी ओशनगेट कंपनीची ही पाणबुडी प्रवासाला निघाली होती, मात्र पहिल्या २ तासातच संपर्क तुटला होता. तसेच एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, शोध पथकाला टायटॅनिक जहाजाजवळ हरवलेल्या पाणबुडीचे अवशेष सापडले आहेत. यूएस कोस्ट गार्डच्या म्हणण्यानुसार पाणबुडीचे अवशेष सापडल्यानंतर तज्ज्ञांच्या पथकाने तपास सुरू केला आहे. कॅनडाच्या एका जहाजात बसलेल्या मानवरहित रोबोटने पाणबुडीचे अवशेष शोधून काढल्याचे सांगण्यात येत आहे.

टायटन पाणबुडीवर बसलेले पाचही लोक सुप्रसिद्ध अब्जाधीश होते. अपघातग्रस्त टायटन पाणबुडीमध्ये ओशनगेट एक्स्पिडिशन्सचे संस्थापक आणि CEO स्टॉकटन रश, ब्रिटिश अब्जाधीश हॅमिश हार्डिंग, प्रसिद्ध फ्रेंच डायव्हर पॉल-हेन्री नार्गोलेट, पाकिस्तानी व्यापारी शहजादा दाऊद आणि त्याचा १९ वर्षांचा मुलगा सुलेमान हे पाच जण होते. याचा मृत्यू झाल्याची माहिती मीडिया रिपोर्टनुसार, समोर येत आहे. दिनांक १८ जून रोजी अमेरिकन कंपनी ओशनगेटची ही पाणबुडी टायटॅनिकचे अवशेष दाखवण्यासाठी प्रवासाला निघाली. टायटॅनिकचा टूर या भग्नावस्थेपर्यंत पोहोचणे, तिथे फिरणे आणि नंतर परत येणे हे सुमारे ८ तास चालते. टायटॅनिकच्या ढिगाऱ्याजवळ जायला २ तास लागतात. चार तास पाणबुडी भग्नावस्थेचा परिसर दाखवते. त्यानंतर परतायलाही सुमारे २ तास लागतात.

समुद्राच्या १२,५०० फूट खोलीत टायटॅनिकचे अवशेष पाहण्यासाठी ८ तास लागतात, तिथे फिरून परत यावे. जायला दोन तास लागतात. ४ तास पाणबुडी टायटनच्या भंगारभोवती फिरते. त्यानंतर पोहोचण्यासाठी सुमारे दोन तास लागतात. अशा स्थितीत टायटन १८ जून रोजी प्रवासाला निघाले तेव्हा सुमारे दीड ते दोन तासांनंतर त्याचा नियंत्रण यंत्रणेशी संपर्क तुटला. म्हणजेच ज्या वेळी पाणबुडीचा संपर्क तुटला, त्या वेळी ती ढिगाऱ्याजवळ पोहोचणार होती. मात्र त्यापूर्वीच ती रस्त्याच्या मधोमध अचानक बेपत्ता झाली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे संपर्क तुटल्यानंतर सुमारे ८ तासांनी अमेरिकेच्या तटरक्षक दलाला अलर्ट मिळाला. अलर्ट मिळताच अमेरिकेच्या तटरक्षक दलाने शोध मोहीम सुरू केली. यूएस कोस्ट गार्डच्या प्रवक्त्याचे म्हणणे आहे की हे बचाव कार्य अतिशय गुंतागुंतीचे आहे.

हे ही वाचा:

भारत-अमेरिका दहशतवादाविरोधात काय म्हणाले, २६/११ चा हिशोब…

Ashadhi ekadashi, वर्षानुवर्षे विठ्ठलाच्या मंदिरात घडणारा ‘हा’ चमत्कार तुम्हाला माहित आहे का ?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version