spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Google Doodle Today आज गूगलचं खास डूडल, जगातील पहिले व्हिडीओ गेम कन्सोल बनवणाऱ्या गेराल्ड जॅरी लॉसन यांची जयंती

कम्प्युटर इंजिनिअर गेराल्ड जॅरी लॉसन (Gerald Jerry Lawson) यांचे एक खास डूडल गूगलनं (Google Doodle) तयार केलं आहे. आज दि. १ डिसेंबर रोजी गेराल्ड जॅरी लॉसन यांची ८२ वी जयंती आहे.

कम्प्युटर इंजिनिअर गेराल्ड जॅरी लॉसन (Gerald Jerry Lawson) यांचे एक खास डूडल गूगलनं (Google Doodle) तयार केलं आहे. आज दि. १ डिसेंबर रोजी गेराल्ड जॅरी लॉसन यांची ८२ वी जयंती आहे. गेराल्ड जॅरी लॉसन हे आधुनिक गेमिंगचे जनक मानले जातात. तसेच त्यांनी जगातील पहिले व्हिडीओ गेम (Video Game) कन्सोल बनवले होते.

गूगलनं गेराल्ड जॅरी लॉसन यांच्या जयंतीनिमित्त खास डूडल तयार केलं आहे. या डूडलवर क्लिक केल्यानंतर लोक एक गेम खेळू शकतात. या गेमच्या माध्यमातून गेराल्ड जॅरी लॉसन यांची माहिती देण्यात आली आहे. तसेच गूगलनं तयार केलेल्या डूडलमध्ये गेराल्ड जॅरी लॉसन हे एका कम्प्युटरवर व्हिडीओ गेम खेळताना दिसत आहेत. या डूडलमध्ये गूगलच्या (Google) स्पेलिंगमधील ओ लेटवर ‘प्ले’ चा लोगो देखील दिसत आहे. या लोगोवर क्लिक केल्यानंतर तुम्ही एक खास गेम खेळू शकता. इंजिनिअर जेराल्ड ‘जेरी’ लॉसन यांच्या योगदानामुळे भारतासह जगभरात व्हिडीओ गेम्स लोकप्रिय झाले. १९९० च्या दशकामध्ये सुपर मारिओ, कॉन्ट्रा आणि डबल ड्रॅगन सरखे व्हिडीओ गेम्स हजारो घरांपर्यंत पोहोचले. ९० च्या दशकातील लोकांकडे हे व्हिडीओ गेम्स आजही आहेत.

गेराल्ड जॅरी लॉसन यांचा जन्म १ डिसेंबर १९४० रोजी न्यूयॉर्क (New York) येथील ब्रुकलिन (Brooklyn) झाला. त्यांनी व्हिडीओ गेम काड्रिजचा शोध लावला. सुपर मारिओ, कॉन्ट्रा हे व्हिडीओ गेम्स गेराल्ड जॅरी लॉसन यांनी घराघरात पोहोचवले. गेराल्ड जॅरी लॉसन यांनी फेअरचाइल्ड चॅनल एफ कन्सोल देखील डिझाइन केले. त्यांना व्हिडीओ गेम कार्टिजचा जनक देखील म्हटले जाते.

गेराल्ड जॅरी लॉसन यांना लहान वयात इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांची आवड निर्माण झाली. त्यांनी स्वत:च्या रेडिओ स्टेशनची निर्मिती केली. कॅलिफोर्नियातील पालो अल्टो येथे करिअर सुरू करण्यापूर्वी त्यांनी क्वीन्स कॉलेज आणि न्यूयॉर्कच्या सिटी कॉलेजमध्ये शिक्षण घेतले. जेराल्ड जेरी लॉसन यांचे ९ एप्रिल २०११ रोजी वयाच्या ७० व्या वर्षी निधन झाले.

हे ही वाचा : 

शास्त्रज्ञांनी घोषित केलेला ४८,५०० वर्ष जुना ‘झोम्बी व्हायरस नेमका काय आहे ? पहा

कुंभमळ्यापूर्वीच नाशिक महानगरपालिका आणि साधू महंतांमध्ये वाद रंगला

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss