spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

आज शिक्षकदिन जाणून घेऊया… डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्याबद्दल

आज ५ सप्टेंबर, शिक्षक दिन! (Teachers Day) देशातील शिक्षकांच्या, प्राध्यापकांच्या कार्याची दखल घेऊन आज त्यांचा गौरव केला जातो.

आज ५ सप्टेंबर, शिक्षक दिन! (Teachers Day) देशातील शिक्षकांच्या, प्राध्यापकांच्या कार्याची दखल घेऊन आज त्यांचा गौरव केला जातो. खरं तर शिक्षक दिन म्हणजे डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती. ५ सप्टेंबर १८८८ रोजी जन्मलेले डॉ. राधाकृष्णन (Dr. Radhakrishnan) हे भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि भारताचे दुसरे राष्ट्रपती होते. डॉ. राधाकृष्णन हे शिक्षक, तत्त्वज्ञ आणि विद्वान म्हणून उल्लेखनीय कार्यासाठी ओळखले जातात.

१९०८ सालानंतर त्यांनी मद्रास प्रेसिडन्सी या कॉलेजात फिलोसोफी हा विषय शिकवायला सुरुवात केली. या कॉलेजात त्यांनी १९१७ पर्यंत आपली सेवा दिली, त्यानंतर ते कलकत्ता युनिवर्सिटीत कार्यरत झाले, असे करता करता करता त्यांनी अनेक युनिवर्सिटीत कार्यभार सांभाळला. १९३१ साली इंग्लंडने डॉ.राधाकृष्णन यांना सर या पदवी ने सन्मानित केले, १९४६-४९ या काळात त्यांची निवड राज्य घटनेच्या समितीचे सभापती म्हणून झाली होती. डॉ.राधाकृष्णन हे बनारस हिंदू युनिवर्सिटी आणि आंध्र युनिवर्सिटीचे सुद्धा कुलगुरू राहिले होते. यादरम्यान त्यांना आंध्र युनिवर्सिटीने १९३९ मध्ये डी.लिट. हि पदवी बहाल केली होती. डॉ. राधाकृष्णन यांचा विवाह लहानपणी म्हणजेच सोळाव्या वर्षी सिवकामू नावाच्या मुलीशी झाला होता, त्यांचे वैवाहिक जीवन बऱ्यापैकी होते, त्यांना एकूण सहा मुल, मुली होते त्यापैकी एक मुलगा होता त्याचे नाव त्यांनी सर्वपल्ली गोपाल असे ठेवले होते, त्यांचे पारिवारिक जीवन चांगले सुरु होते पण १९५६ मध्ये त्यांच्या पत्नीचे निधन झाले, या गोष्टीचे त्यांना दुखः झाले पण ते त्यांचे कर्तव्य बजावत राहिले.

१९५२ साली डॉ. राधाकृष्णन यांची उपराष्ट्रपती पदी निवड झाली होती. त्यानंतर १९५७ च्या दुसऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत ते पुन्हा उपराष्ट्रपती झाले. उपराष्ट्रपती पदी त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल भारत सरकार ने १९५८ साली त्यांना देशाचा सर्वोच्च पुरस्कार भारतरत्न देण्यात आला. यानंतर १९६२ मध्ये डॉ. राधाकृष्णन यांची राष्ट्रपती पदासाठी निवड झाली, आणि ते देशाचे राष्ट्रपती बनले. त्यानंतर त्यांच्या काही विधार्थ्यांनी त्यांचा जन्म दिवस हा “शिक्षक दिन” म्हणून साजरा करण्याची इच्छा व्यक्त केली,

डॉ. राधाकृष्णन यांना हा विचार आवडला कि आपला जन्मदिवस शिक्षकांच्या सन्मानासाठी जर साजरा केला जात असेल तर हि कल्पना उत्तम असल्याचे सांगत त्यांनी या कल्पनेला मान्यता दिली, आणि तेव्हापासून ५ सप्टेंबर या दिवसाला शिक्षक दिन म्हणून साजरे केल्या जाऊ लागले.

डॉक्टर राधाकृष्णन यांना अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

  • राधाकृष्णन यांना शिक्षण आणि राजनीतीचा क्षेत्रात उत्कृष्ट योगदानाबद्दल १९५४ साली भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान भारत रत्न देण्यात आला.
  • १९६२ ला त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ प्रतिवर्ष ५ सप्टेंबरला शिक्षक दिवस साजरा केल्या जाण्याची घोषणा करण्यात आली.
  • सन १९६२ मध्ये राधाकृष्णन यांना ब्रिटिश अकॅडमी चे सदस्य बनवण्यात आले.
  • १९६३ मध्ये त्यांना ब्रिटिश ऑर्डर ऑफ मेरिट चा सन्मान देण्यात आला.
  • १९६८ मध्ये साहित्य अकादमी द्वारा त्यांना सभासद बनवण्यात आले. हा सन्मान प्राप्त करणारे ते पहिले व्यक्ती होते.
  • १९८४ मध्ये डॉ. राधाकृष्णन यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

डॉ. राधाकृष्णन यांची काही उल्लेखनीय कामं – Reign of Religion in Contemporary Philosophy, Philosophy of Rabindranath Tagore, The Hindu View of Life, Kalki or the Future of Civilisation, An Idealist View of Life, The Religion We Need, India and China, Gautama the Buddha

 

हे ही वाचा:

शिक्षकदिनी यूजीसीकडून पाच नव्या अनुदान योजना

फोडा-झोडा-मजा पहा… , सामनातून भाजपवर हल्लाबोल

राशी भविष्य – 5 September 2022 – जवळच्या मंडळींचे सहकार्य…

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss