नवीन वर्षाच्या स्वागतासाठी शिमला मनालीमध्ये पर्यटकांची मोठी गर्दी

नाताळ सणाच्या सुट्यांमुळे आणि नवीन वर्षाचा मोठा विकेंड असल्यामुळे सगळीकडे पर्यटकांची मोठ्या प्रमाणवर गर्दी वाढली आहे.

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी शिमला मनालीमध्ये पर्यटकांची मोठी गर्दी

नाताळ सणाच्या सुट्यांमुळे आणि नवीन वर्षाचा मोठा विकेंड असल्यामुळे सगळीकडे पर्यटकांची मोठ्या प्रमाणवर गर्दी वाढली आहे. राज्यातील मंदिरांमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली आहे. यंदाच्या वर्षी शिमला आणि मनालीमध्ये पर्यटक मोठ्या संख्यने गेले आहेत. यातून मनाली आणि शिमलामधील हॉटेल्स, टॅक्सी व्यवसाय आणि बस ऑपरेटर्स यांना मोठ्या प्रमाणात उत्पादन मिळाले आहे. नाताळच्या विकेंडमध्ये रोहतांगमधील अटल बोगद्याबाहेर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी सगळीकडे मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली आहे. त्यातच इंधनाच्या विक्रीमध्ये चांगलीच वाढ झाली आहे. ख्रिसमस विकेंडला रविवारी २८,२१० पेक्षा जास्त वाहनांनी हा बोगदा पार केला. तसेच शिमला आणि मनालीमध्ये ९० टक्के हॉटेल बुक झाले आहेत. शिमल्यामध्ये एका दिवसात १३ हजार वाहनांनी प्रवास केला आहे. यामध्ये ६ हजार वाहने सोलनहून शिमला तर ७ हजार वाहने शिमल्याहून सोलनला गेली आहेत. मनालीमध्ये सुद्धा काहीशी अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे सगळ्यांच्या उत्पादनात चांगली वाढ झाली आहे. हॉटेल्ससोबतच टॅक्सीचालकांचे बुकिंगसुद्धा पूर्ण क्षमतेने सुरू आहे. नवीन वर्ष निमित्त सगळी हॉटेल्स २४ तास सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मनाली कार्निव्हल १ ते ६ जानेवारी दरम्यान होणार आहे. शिमल्यात देखील बहुतेक हॉटेल्स बुक झाले आहेत.

यंदा हिमाचल मधील बहुतांश भागात ३० आणि ३१ डिसेंबर रोजी बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर ये जा वाढली आहे. तसेच स्थानिक लोकांच्या उत्पादनात वाढ होण्याची शक्यता आहे. मोठ्या संख्येने लोक शिमला मनालीमध्ये जात असल्यामुळे सर्व रस्त्यांवर वाहतूक कोंडी वाढली आहे. संपूर्ण देशात नवीन वर्षाचे स्वागत धुमधडाक्यात होत असली तरी पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले आहे. अनेक ठिकाणी नव्या विषाणूची लागण होत आहे.

हे ही वाचा:

माधुरी दीक्षित निवडणूक लढवणार; माधुरीचा मोठा खुलासा

पुण्यातील या ठिकाणी झाला सिलेंडरचा मोठा स्फोट, एकाच वेळी फुटले १० सिलेंडर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version