spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

टोयोटा किर्लोस्कर मोटरचे उपाध्यक्ष विक्रम किर्लोस्कर यांचे निधन

टोयोटा किर्लोस्कर ग्रुपचे उपाध्यक्ष (Vice President of Toyota Kirloskar Group) विक्रम किर्लोस्कर यांचं निधन (Vikram Kirloskar Passed Away) झालंय. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झालंय. ते ६४ वर्षांचे होते. टोयोटा कारला लोकप्रियतेच्या शिखरावर घेऊन जाण्यात, लोकांच्या मनात या कारविषयी विश्वास आणि आवड निर्माण करण्यात त्यांचा मोठा वाटा राहिला आहे. त्यांच्या जाण्याने उद्योग जगतावर शोककळा (Mourning the industry) पसरली आहे.

विक्रम किर्लोस्कर यांनी ‘एमआयटी’मधून मेकॅनिकल इंजिनीअरिंगची (Mechanical Engineering) पदवी घेतली होती त्यांनी CII, SIAM आणि ARAI मध्ये अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केलं. विक्रम किर्लोस्कर हे किर्लोस्कर समूहाच्या चौथ्या पिढीचे प्रमुख होते. ते किर्लोस्कर सिस्टम्स लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकही होते. तसेच टोयोटा किर्लोस्कर मोटर प्रायव्हेट लिमिटेडचे ते उपाध्यक्ष होते. २५ नोव्हेंबर २०२२ रोजी मुंबईतील टोयोटा इनोव्हा हायक्रॉसच्या एका कार्यक्रमात विक्रम किर्लोस्कर हे शेवटचे सार्वजनिक व्यासपीठावर आले होते.

टोयोटा इंडियाने मीडिया निवेदन जारी करून विक्रम किर्लोस्कर यांच्या मृत्यूबद्दल माहिती दिली आहे. २९ नोव्हेंबर २०२२ रोजी टोयोटा किर्लोस्कर मोटरचे उपाध्यक्ष विक्रम एस किर्लोस्कर यांच्या अकाली निधनाबद्दल आम्हाला कळवताना अत्यंत दु:ख होत आहे. या दुःखाच्या प्रसंगी त्यांच्या आत्म्याला शांती लाभो हीच प्रार्थना. आम्ही त्यांच्या कुटुंबीयांप्रति आणि मित्रांप्रति आमच्या मनापासून संवेदना व्यक्त करतो. विक्रम किर्लोस्कर यांच्यावर ३० नोव्हेंबर २०२२ रोजी दुपारी १ वाजता हेब्बल स्मशानभूमी, बेंगळुरू येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील.

एका कार्यक्रमात विक्रम किर्लोस्कर यांना किर्लोस्कर मोटरच्या रणनीतीबद्दल विचारले असता ते म्हणाले होते की, कार्बन उत्सर्जन कमी करणं हे देशाचं उद्दिष्ट आहे आणि आम्हाला वैज्ञानिक आधारासह या प्रकरणाकडे सर्वांगीणपणे पहावं लागेल. भारतात इलेक्ट्रिक वाहनांचा ट्रेंड वाढत असताना, हायब्रीड वाहनांवर किर्लोस्कर मोटरच्या रणनीतीबद्दलही त्यांनी सांगितलं होतं.

हे ही वाचा : 

नवाब मलिकांच्या जमीन अर्जावर आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी

गोरेगावच्या पूर्व आयटी पार्कमागील जंगल परिसरामध्ये भीषण आग

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss