TRENDING: शीख धर्मगुरू गुरुनानक यांची जयंती

TRENDING: शीख धर्मगुरू गुरुनानक यांची जयंती

पंचांगानुसार गुरू नानक (GURUNANAK JAYANTI) जयंती कार्तिक (KARTIK) महिन्याच्या पौर्णिमेला साजरी केली जाते. या पौर्णिमेला ‘गुरु परब’ (GURU PARAB) किंवा ‘प्रकाश पर्व’ असे म्हणतात. शीख धर्माच्या लोकांसाठी हा दिवस एखाद्याचा सणापेक्षाही मोठा असतो. या दिवशी शीख बांधव मोठ्या उत्साहाने अनेक कार्यक्रम आणि कीर्तनाच्या माध्यमाने हा सण साजरा करतात. या खास दिवसाची तयारी खूप आधीपासूनच सुरू केली जाते. या दिवशी प्रभात फेऱ्या काढल्या जातात. या काळात नागरिक गुरुद्वारांमध्ये जाऊन सेवा करतात.

गुरुनानक देवजींना शीख धर्माचे पहिले गुरू मानले जाते. त्यांना ‘नानक देव’, ‘बाबा नानक’ आणि ‘नानक शाह’ या नावाने ओळखले जाते. लडाख आणि तिबेटच्या प्रदेशात त्यांना ‘नानक लामा’ असे म्हणतात. गुरुदेव यांचा जन्म १५२६ मध्ये कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी झाला. हा दिवस दिव्यांचा सण म्हणून साजरा केला जातो. गुरुनानक यांनी मनुष्याच्या जीवनाशी संबंधित अनेक शिकवणी दिल्या आहेत. त्या शिकवणीचे आजही शीख बांधवांकडून पालन केले जाते.

गुरुनानक देव यांचा जन्म भोईची तलवंडी येथे झाला. या ठिकाणाला ‘रायभोईची तलवंडी’ असेही म्हटले जाते. आता हे ठिकाण पाकिस्तानच्या ननकाना साहेबमध्ये आहे. या ठिकाणाला गुरुनानक देव यांचे नाव देण्यात आले. ‘ननकाना साहेब’ गुरुद्वाराची निर्मिती राजा महाराजा रणजीत सिंह यांनी केली होती. गुरुनानक देवजींनी शीख समाजाची पायाभरणी केली. गुरुनानक हे शीख समाजाचे पहिले गुरु आणि या धर्माचे संस्थापक मानले जातात. भारताव्यतिरिक्त गुरुनानक देवजींनी अफगाणिस्तान, इराण आणि अरब देशांमध्येही प्रवचन दिले आहे. त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचे तर वयाच्या सोळा वर्षी सुलखानीसोबत त्यांचे लग्न झाले. त्यांना श्रीचंद आणि लखमीदास असे दोन पुत्र झाले. गुरुनानक देव यांनी आपले जीवन मानव समाजाच्या कल्याणासाठी समर्पित केले. त्यांचा जन्मदिन प्रकाशाचा पर्व म्हणून साजरा केला जातो.

हे ही वाचा:

Health Supplements: कोणी घ्यावीत? किती घ्यावीत?

THANE: बांधकाम साहित्यात १२ फुट लांबीचा अजगर, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version