Twitter Down; लॅपटॉप, डेस्कटॉपवर लॉगिनही होत नाहीये, कारणही कळेना

सोशल मीडियावरील व्यक्त होण्याचा महत्त्वाचा सोर्स असलेलं ट्विटर ढेपाळलं आहे. आज सकाळीच ट्विटर डाऊन झालं. लॉग इनही करता येत नव्हतं आणि मेसेजही पोस्ट करता येत नव्हता.

Twitter Down; लॅपटॉप, डेस्कटॉपवर लॉगिनही होत नाहीये, कारणही कळेना

सोशल मीडियावरील व्यक्त होण्याचा महत्त्वाचा सोर्स असलेलं ट्विटर ढेपाळलं आहे. आज सकाळीच ट्विटर डाऊन झालं. लॉग इनही करता येत नव्हतं आणि मेसेजही पोस्ट करता येत नव्हता. त्यामुळे जगभरातील ट्विटर यूजर्स त्रस्त झाले आहेत. शिवाय ट्विटरकडून कोणतंही कारण न देण्यात आल्याने यूजर्स अधिकच त्रस्त झाले आहेत. ट्विटर कधी सुरू होणार याकडेच सर्वांचं लक्ष लागलं आहे. ट्विटर यूजर्सना पुन्हा एकदा अडचणींचा सामना करावा लागत आहे. ट्विटर मोबाईलवर काम करत आहे, परंतु लॅपटॉप आणि डेस्कटॉपवर काम करणारे युझर्सना त्यांचे अकाऊंट लॉग इन करण्यात समस्या येत आहेत.

बुधवारी रात्रीपासून युझर्सना अशा समस्यांना सामोरे जावे लागत आहे. युझर्सना डेस्कटॉप किंवा लॅपटॉवरून लॉग इन करताना एरर मेसेज येत आहे. तसंच पुन्हा एकदा लॉग इन करण्यास सांगितलं जात आहे. परंतु पुन्हा लॉग इनचा प्रयत्न केल्यानंतर अन्य सर्व पर्याय गायब होत असल्याची समस्या दिसून येत आहे. पहिल्यांदा लॉग इन करण्याचा प्रयत्न केल्यानंतर “Something went wrong, but don’t fret — it’s not your fault. Let’s try again.” हा मेसेज दिसत असल्याची तक्रार अनेक युझर्सनं केली आहे. रिफ्रेश केल्यानंतर हा मेसेज पुन्हा दिसतो आणि लॉग इनही होत नाही. लॉग आऊटवर क्लिक केल्यानंतरही पेज लोडिंग सुरू होतं. अनेकदा रिफ्रेश केल्यानंतरही हीच समस्या कायम राहत असल्याची तक्रार काही युझर्सनं केली आहे.

 

आज सकाळी ७ वाजून १३ मिनिटांपासून ट्विटरवर हि समस्या येत होती. त्यामुळे जगभरातील यूजर्सना लॉगिन करता येत नाहीये. सारखा एररचा मेसेज येत आहे. अकाऊंट लॉग इनच होत नाहीये त्यामुळे यूजर्सना मेसेजही करता येत नाहीये. काहींचे अकाऊंटही लॉग आऊट झाले आहेत. त्यामुळे यूजर्स अधिकच त्रस्त झाले आहेत. शिवाय ट्विटरकडूनही या बिघाडावर काहीच खुलासा न झाल्याने ट्विटर का डाऊन आहे ? हे समजून येत नाहीये. अल जजिराने याबाबतचं वृत्त दिलं आहे. अल जजिराच्या मते, सकाळी ७.३० वाजेपर्यंत ८७०० यूजर्सनी आपल्या अडचणी सांगितल्या. लॉग इन करताना एररचा मेसेज येत असल्याचं यूजर्सनी सांगितल्याचं अल जजिराने म्हटलं आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या महिन्यात दुसऱ्यांदा ट्विटर ढेपाळलं आहे. ११ डिसेंबर रोजीही ट्विटरवर अशी समस्या येत होती. तेव्हाही यूजर्संना अडचणींचा सामना करावा लागला होता. मात्र, त्यावेळी ट्विटर का ढेपाळलं याचं कारण ट्विटर कंपनीकडून तात्काळ देण्यात आलं होतं.

रॉयटर्सनुसार आउटरेज ट्रॅकिंग वेबसाईट Downdetector.com नं अमेरिकेत साडेसात वाजेपर्यंत १० हजारांपेक्षा अधिक युझर्सनं ट्विटरच्या समस्येबद्दल सांगितल्याचं म्हटलं. काही युझर्सनं नोटिफिकेशनच्या समस्येबाबतही सांगितलं. काही दिवसांपूर्वी मस्क यांनी ४४ बिलियन डॉलर्समध्ये ट्विटरची मालकी आपल्याकडे घेतली होती. त्यानंतर कोणत्या ना कोणत्या कारणामुळे ट्विटर चर्चेत आहे.

 

हे ही वाचा:

महाराष्ट्रातील पारा घसरला तर देशातील काही ठिकाणी पावसाचा तडाखा, जाणून घ्या कोणत्या भागात काय स्थिती?

Rahul Gandhi चे लग्न? पहिल्यांदाच केलं लग्नाच्या मुद्द्यावर भाष्य, अखेर मनातली ‘ती’ गोष्ट आली ओठांवर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version