spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Twitter :ट्विटरवर ट्रम्पचे पुनरागमन; मतदानानंतर ट्रम्पना खाते पुन्हा सोपवण्यात आले

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना त्यांचे ट्विटर खाते पुन्हा सोपवण्यात आले आहे. ट्विटरचे नवीन मालक एलॉन मस्कयांनी मतदान घेतले त्यात डोनाल्ड ट्रम्प यांच्या बाजूने निकाल लागला त्यानंतर ट्विटरचे मालक एलोन मस्क यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर खात्यावर ट्विट केले की ‘डोनाल्ड ट्रम्प यांना त्यांचे ट्विटर खाते पुन्हा देण्यात येणार आहे.’

२०२१ मध्ये कॅपिटल हिल दंगलीनंतर “हिंसा आणखी भडकावण्याची शक्यता होती त्यामुळे” ट्रम्प यांच्या ट्विटर खात्यावर बंदी घालण्यात आली होती. त्याच्या फेसबुक पेजवरही अशीच कारवाई करण्यात आली होती.अलीकडेच ट्रम्प यांनी २०२४ च्या अध्यक्षीय निवडणुकीत उमेदवारी जाहीर केले होते आणि आता ट्रम्प यांना त्यांचे ट्विटर खाते पुन्हा सोपवण्यात येणार आहे. काल अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या बंद झालेल्या ट्विटर खात्या संधर्भात काय करावे यावर ट्विटरचे नवीन मालक आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क यांनी अमेरिकेतील जनतेचं मत घेण्याचा निर्णय घेतला. एलॉन मस्क यांनी काल त्यांच्या ट्विटर खात्यावरून अमेरिकेतील जनतेला “माजी अध्यक्ष ट्रम्प पुन्हा ट्विटरवर हवे आहेत का?” असा प्रश्न विचारत ‘हो’ किव्हा ‘नाही’ असे दोन पर्याय जनतेसाठी ठेवले होते. त्यात मस्क यांच्या मायक्रोब्लॉगिंग साइटवर माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प याना परत येण्यास विरोध करणाऱ्यांपेक्षा “होय” निवडलेल्या लोकांची संख्या जास्त आहे . सुमारे ५१. टक्के वापरकर्त्यांनी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष ट्विटरवर परत यायला हवे यावर होकार दिला आहे .

ट्विटरमध्ये राजीनामा सत्र सुरू असतानाच शनिवारी एलॉन मस्क यांनी नवं ‘कंटेंट मॉडरेशन’ धोरण जाहीर केलं आहे. त्याचबरोबर काही बंद खाती पुन्हा सुरू करण्याचा निर्णयही ट्विटरनं घेतला आहे. एलॉन मस्क यांनी सांगितल आहे की “नकारात्मक आणि द्वेषयुक्त ट्विट्स काढून टाकले जातील. अशा ट्विट्सच्या जाहिराती ट्विटर चालवणार नाही. जोपर्यंत ट्विट्स विशेषत: शोधले जाणार नाहीत, तोपर्यंत ते सापडणार नाहीत”, तसेच हे नियम केवळ वैयक्तिक ट्विटला लागू असणार आहे. असे मस्क यांनी सांगितल.

लहानांपासून मोठ्यांना आवडेल असेल चॉकलेट सँडविच

Latest Posts

Don't Miss