spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

श्रीरामाच्या मूर्तीसाठी नेपाळहून दोन दिव्या शाळीग्राम दगड दाखल, ५१ आचार्यांच्या हस्ते झाले पूजन

हे दोन मोठे दगड बुधवारी संध्याकाळी नेपाळमधून रामसेवकपुरम येथे पोहोचवण्यात आले.

नेपाळच्या काली गंडकी नदीतून आणलेले दोन मोठे खडक श्रीरामाच्या मूर्तीला समर्पित करण्यात आले आहेत. हे दोन मोठे दगड बुधवारी संध्याकाळी नेपाळमधून रामसेवकपुरम येथे पोहोचवण्यात आले. प्राचीन मिथिला, नेपाळची राजधानी जनकपूर येथील जानकी मंदिराचे महंत राम तपेश्वर दास आणि नेपाळचे माजी उपपंतप्रधान विमलेंद्र निधी यांनी गुरुवारी रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपतराय यांना समर्पण पत्राद्वारे औपचारिकरित्या त्यांना अर्पण केले.

त्यानंतर ५१ वेदशिक्षकांनी विधीपूर्वक शिळांची पूजा केली. शिळा समर्पण समारंभ एका छोट्या सभेच्या स्वरूपात सादर करण्यात आला आणि वक्त्यांनी या प्रसंगाचे वर्णन नेपाळ आणि अयोध्या यांच्या प्राचीन संबंधांना नवीन दृष्टीकोन आणि शैली प्रदान करणारा प्रसंग म्हणून केले आहे. जानकी मंदिराचे महंत राम तपेश्वर दास यांनी ‘दुल्हा-दुल्हन सरकार की जय’ असा गजर करत अयोध्या आणि नेपाळच्या त्रेतायुगातील संबंध पुन्हा जिवंत केले.

नेपाळचे माजी उपपंतप्रधान म्हणाले की, पूर्वी जनकपूरशी संबंधित श्रीरामाच्या वारशाच्या अनुषंगाने त्यांना रामललाला धनुष्य अर्पण करायचे होते, परंतु रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टशी दोन वर्षांच्या संवादानंतर असे ठरले की नेपाळची गंडकी नदीतील दिव्य दगड २०१६ पासून श्रीरामाच्या मूर्तीसाठी अर्पण केला जावा आणि आम्हाला हा खडक समर्पित करताना खूप आनंद होत आहे. चंपतराय यांनी जनकपूर मंदिर, नेपाळ सरकार आणि तेथील लोकांचे दगड समर्पित केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

यावेळी या दिव्य दगडांच्या स्वागतासाठी संत आणि अयोध्यावासीय मोठ्या संख्येने जमले होते. यामध्ये जगद्गुरू परमहंस आचार्य, गुरुद्वारा ब्रह्मा कुंडचे मुख्य ग्रंथी ग्यानी गुरुजित सिंह, आमदार रामचंद्र यादव, राम मंदिर समर्थक मुस्लिम नेते बबलू खान, जिल्हा भाजप अध्यक्ष संजीव सिंह, महानगर अध्यक्ष अभिषेक मिश्रा, कारसेवकपुरम प्रभारी शिवदास सिंह आदी उपस्थित होते. मध्यंतरी रामाच्या मूर्तीसाठी नेपाळहून आलेला खडा ठेवण्याआधी याबाबत खूप चर्चा झाली होती. कोणी त्याच्यापुढे नतमस्तक झाले होते, कोणी त्याच्यावर टीका करत होते तर कोणी दगडांसोबत सेल्फी काढत होते.

हे ही वाचा:

जनतेच्या मतांचा कल व मताधिक्य बघितले तर महाराष्ट्र ‘मविआ’च्या पाठीमागे ठाम उभा आहे, जयंत पाटील

हसन मुश्रीफ यांना मोठा झटका, जिल्हा बँकेचे ५ जण चौकशीसाठी ताब्यात

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss