spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मध्यप्रदेशमध्ये भारतीय हवाई दलाच्या दोन लढाऊ विमानाचा भीषण अपघात

सध्या रेल्वे, बस यांच्या पाठोपाठ आता विमान प्रवासासंबंधीच्या अनेक घटना आणि तक्रारी समोर येत आहेत. रोज एक नवीन घटना बघायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी एअर इंडियाच्या विमानात एका महिला प्रवाशावर लघुशंका केल्याची घटना गाडली होती.

सध्या रेल्वे, बस यांच्या पाठोपाठ आता विमान प्रवासासंबंधीच्या अनेक घटना आणि तक्रारी समोर येत आहेत. रोज एक नवीन घटना बघायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी एअर इंडियाच्या विमानात एका महिला प्रवाशावर लघुशंका केल्याची घटना गाडली होती. तर दोन दिवसांपूर्वी दुबई-जयपूर विमानाच्या अपहरणाबद्दल खोटे ट्विट एका प्रवाशाने केलं. या सर्व घटना ताज्या असतानाच आता अजून एका घटनेची भर त्यात पडली आहे. भारतीय हवाई दलाची दोन लढाऊ विमानाचा अपघात झाला आहे. मध्य प्रदेशातील मोरेनाजवळ हा अपघात झाला. त्या दोन लढाऊ विमानामध्ये सुखोई – 30 आणि मिराज 2000 अशी दोन विमाने (Sukhoi-30 and Mirage 2000 aircraft crashed near Morena) होती. या घटनेची माहिती मिळताच बचाव पथक घटनास्थळी पोहोचले.

 शनिवारी काही तासांमध्ये भारती हवाई दलाची तीन विमाने दुर्घटनाग्रस्त झाल्याने खळबळ उडाली आहे. हवाई दलाचे एक लढाऊ विमान राजस्थानमध्ये तर दोन विमाने मध्य प्रदेशमध्ये दुर्घटनाग्रस्त झाली. अवघ्या काही तासांमध्ये तीन विमानांचा अपघात झाल्याने खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील दोन्ही विमानांनी ग्वाल्हेर एअरबेसवरून उड्डाण केले, जेथे सराव सुरू होता. शनिवारी सकाळी हा मोठा अपघात मध्य प्रदेशमधील मुरैना येथे झाला आहे. त्यामध्ये हवाई दलाची दोन लढाऊ विमाने सुखोई-३० आणि मिराज २००० अपघातग्रस्त झाली.

जेट विमान पहाटे साडेपाच वाजता कोसळले, अशी माहिती मुरैनाचे जिल्हाधिकारी यांनी दिली आहे. तर या अपघातानंतर कोर्ट ऑफ इन्क्वायरी स्थापन करणी या अपघाताची चोकशी करण्यास सुरवात केली आहे. ही दोन्ही विमाने एकमेकांवर आदळली की आणखी काही कारणामुळे अपघात झाला या सर्व गोष्टींची चौकशी केली जाणार आहे. अपघातादरम्यान सुखोई 30 मध्ये दोन पायलट होते तर मिराज 2000 मध्ये एक पायलट होता. दोन पायलट सुरक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे तर हवाई दलाचे हेलिकॉप्टर तिसऱ्या पायलटच्या ठिकाणी पोहोचले आहे.

 तसेच एकीकडे मध्यप्रदेशमध्ये हि घटना घडली तर दुसरीकडे राजस्थानच्या भरतपूर जिल्ह्यात देखील विमानाचा अपघात झाला आहे. त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. राजस्थानमध्ये शनिवारी सकाळी चार्टर्ड विमान कोसळले. अपघातानंतर विमानाचे तुकडे झाले आणि मोठ्या आवाजासह त्याला आग लागली. सुदैवाने हे विमान मोकळ्या जागेवर कोसळले. मात्र त्यात किती प्रवासी होते, याबाबत माहिती मिळू शकलेली नाही.

हे ही वाचा:

WPL Team Auction महिला आयपीएलमध्ये होणार अदानी विरुद्ध अंबानी लढत, तर इतक्या रुपयांना दोघांनी विकत घेतले संघ

Republic Day 2023, यंदा प्रजासत्ताक दिनानिम्मित व्हाट्सअँप द्वारे द्या शुभेच्छा!

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss