उदय सामंतांची मान्य केली मागणी, CM एकनाथ शिंदेंनी केली मोठी घोषणा

गेल्या काही दिवसांपासून देशात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्यावरुन भाजप आणि काँग्रेसमध्ये राजकारण तापलं. काँग्रेस नेते राहुल गांधी यांना लोकसभा सचिवालयाने अपात्र ठरवलं होते. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना, राहू;ल गांधी म्हणाले “मी कोणाला घाबरत नाही. मी गांधी आहे, सावरकर नाही. मी सभागृहात असो किंवा बाहेर मला फरक पडत नाही.

उदय सामंतांची मान्य केली मागणी, CM एकनाथ शिंदेंनी केली मोठी घोषणा

गेल्या काही दिवसांपासून देशात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्यावरुन भाजप आणि काँग्रेसमध्ये राजकारण तापलं. काँग्रेस नेते राहुल गांधी यांना लोकसभा सचिवालयाने अपात्र ठरवलं होते. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना, राहू;ल गांधी म्हणाले “मी कोणाला घाबरत नाही. मी गांधी आहे, सावरकर नाही. मी सभागृहात असो किंवा बाहेर मला फरक पडत नाही.असे वक्तव्य केल्यानंतर भाजप आणि शिंदे सरकारकडून राज्यभर आंदोलन, स्वागत यात्रा काढण्यात आली. आणि त्यामुळे राहुल गंद्धीच्या वक्तव्याला वेगळेच वळण निर्माण झाले. राहुल गांधी केलेल्या वक्तव्यामुळे राज्यभरात त्याच्याबद्दल द्वेष निर्माण झाला. असे असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे. आता महाराष्ट्रात  २८ मे हा दिवस ‘स्वातंत्र्यवीर गौरव दिन’ म्हणून साजरा केला जाणार आहे. असा जाहीरपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषित केले आहे.

देशाच्या स्वातंत्र्यासाठी, राष्ट्रउन्नतीसाठी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे मोठे योगदान आहे. त्यांची देशभक्ती,धैर्य,प्रगतीशील विचारांना पुढे नेण्यासाठी, त्या माध्यमातून त्यांना अभिवादन करण्यासाठी ‘स्वातंत्र्यवीर गौरव दिन’ साजरा करण्याची मागणी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली होती.उदय सामंत यांच्या विनंतीला मन देऊन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिदे यांनी लगेचच कसला हि विलंब न करता स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा २८ मे हा जन्मदिवस राज्य शासनामार्फत ‘स्वातंत्र्यवीर गौरव दिन’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे,अशी घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी केली. तसेच उदय सामंत यांनी स्वातंत्र्यवीर वि. दा सावरकर यांचा जन्मदिवस “वीर स्मरण दिन”म्हणून साजरा करावा अशी मागणी केली होती. याप्रकरणी निवेदनही सामंत यांनी मुख्यमंत्री शिंदे दिले होते.

वीर सावरकर यांची जयंती  २८ मे राज्य सरकारतर्फे ‘स्वातंत्र्यवीर गौरव दिन’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्यानंतर या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांच्या विविध कार्यक्रमांचे प्रचार-प्रसारासाठी आयोजनही करण्यात येणार आहे. असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयातून ट्विट करत सांगण्यात आले आहे. राहुल गांधींच्या विधानानंतर देशभरातून संतापाची लाट उसळली होती. तर, महाराष्ट्रात शिवसेना ( शिंदे गट ) आणि भाजपाच्या वतीने सर्व जिल्ह्यांतून ‘सावरकर गौरव यात्रा’ काढण्यात आलेली. तेव्हाच मंत्री उदय सामंत यांनी वीर सावरकर यांची जयंती ‘स्वातंत्र्यवीर गौरव दिन’ साजरा करण्यात यावी, अशी मागणी केली होती. त्यानुसार ११ एप्रिल रोजी उदय सामंत यांच्या विनंतीचा मान ठेवून त्यांच्या या विचाराचा मुद्दा लक्षात ठेऊन मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या शिफारसीस उजवा कौल दिला.

हे ही वाचा : 

युवा नेते आदित्य ठाकरे आज हैदराबाद दौऱ्यावर

संजय राऊत आणि चंद्रकांत पाटील पुन्हा एकदा आमने – सामने

महाराष्ट्र दिनी बीकेसी मैदानावर पार पडणार मविआची Vajramuth Sabha

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version