Ukrain Russia War कीवमध्ये हेलिकॉप्टरचा अपघात, युक्रेनच्या गृहमंत्र्यांसह १८ जणांचा मृत्यू

एएफपी या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, हेलिकॉप्टरचा अपघात बाल देखभाल केंद्राजवळ झाला.

Ukrain Russia War कीवमध्ये हेलिकॉप्टरचा अपघात, युक्रेनच्या गृहमंत्र्यांसह १८ जणांचा मृत्यू

रशियाबरोबरच्या युद्धादरम्यान युक्रेनची राजधानी कीव येथे बुधवारी सकाळी हेलिकॉप्टर क्रॅश झाले, ज्यामध्ये किमान १८ लोकांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात युक्रेनचे गृहमंत्री डेनिस मोनास्टिरस्की यांचाही मृत्यू झाला आहे. बीबीसीच्या वृत्तानुसार, या अपघातात युक्रेनचे गृहमंत्री आणि अन्य एका अधिकाऱ्याचाही मृत्यू झाला आहे. एएफपी या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, हेलिकॉप्टरचा अपघात बाल देखभाल केंद्राजवळ झाला.

पोलिसांनी सांगितले की, मृतांपैकी नऊ जण कीवच्या ब्रोव्हरी येथे कोसळलेल्या आपत्कालीन सेवा हेलिकॉप्टरमध्ये होते. वृत्तसंस्था रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार, अधिकाऱ्यांनी सांगितले की, मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश आहे. ब्रोव्हरी शहर कीवच्या उत्तर-पूर्वेस स्थित आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये घटनेनंतरचे बचावकार्य दिसत आहे. हे हेलिकॉप्टर क्रॅश रशियाच्या हल्ल्यामुळे घडले आहे की स्वतःहून घडले आहे, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. यासोबतच राजधानी कीवमध्ये कोणताही हल्ला झाल्याची माहिती नाहीये. त्याचवेळी, कीवचे प्रादेशिक गव्हर्नर म्हणाले की, या अपघातात १५ मुलांसह एकूण २९ जण जखमी झाले आहेत.

हे ही वाचा:

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम प्राजक्ता माळीचा हटके लूक, फोटो पाहून व्हाल आश्चर्यचकित

Sukh Mhanje Nakki Kay Asta मालिकेत दिसणार जयदीपचा हटके लूक

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version