spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Ultraviolette F77 Electric Bike : अल्ट्राव्हायोलेट F77 न्यू इलेक्ट्रिक बाईक, या महिन्यात होणार लॉन्च

अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर, अल्ट्राव्हायोलेट ऑटोमोटिव्हने अखेरीस त्यांच्या स्पोर्ट्स इलेक्ट्रिक बाइक अल्ट्राव्हायोलेट F77 च्या लॉन्चची तारीख जाहीर केली आहे. अल्ट्राव्हायोलेट F77 ची किंमत २४ नोव्हेंबर रोजी उघड होईल. कंपनीने २०१९ मध्येच या इलेक्ट्रिक बाईकच्या प्री-प्रॉडक्शन मॉडेलची झलक दाखवली होती आणि तिचे उत्पादन तयार मॉडेल इलेक्ट्रिक टू-व्हीलर मार्केटमध्ये खळबळ उडवून देणार आहे. आता आम्ही तुम्हाला या इलेक्ट्रिक बाईकबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या.

हेही वाचा : 

भाजपबरोबर असलेले सर्व नेत्यांना क्लीन चिट आणि विरोधक मात्र भ्रष्टचारी – भास्कर जाधव

अॅडजस्टेबल सस्पेंशन, ओव्हर-द-एअर (OTA) अपग्रेड, बाईकट्रॅकिंग, रीजनरेटिव्ह ब्रेकिंग, ड्युअल-चॅनल ABS यासारखे फीचर्स आहेत. कंपनीने माहिती दिली आहे की, 190 देशांतील 70,000 हून अधिक लोकांनी आधीच याची प्री-बुकिंग केली आहे. F77 चे साइड पॅनेल्स फ्रेम आणि बॅटरी पॅक व्यवस्थित कव्हर करतात.

अल्ट्राव्हायोलेट F77 एका चार्जवर 200 किमी पर्यंतची रेंज मिळवू शकते. कंपनीचा दावा आहे की, ही बाईक फक्त 2.9 सेकंदात 0-60 किमी प्रतितास वेग गाठू शकते. तसेच या इलेक्ट्रिक बाईकचा कमाल वेग 140 किमी प्रतितास असेल. अल्ट्राव्हायोलेटने दिलेल्या माहितीनुसार, देशभरातील विविध भूभाग आणि हवामान परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी F77 ची टेस्ट घेण्यात आली आहे.

Diwali २०२२ : राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी गिफ्ट ; ऑक्टोबर महिन्याचं वेतन दिवाळीआधीच

दरम्यान, प्रसिद्ध दुचाकी उत्पादक कंपनी TVS दिवाळीआधी आपली नवीन बाईक भारतात लॉन्च करणार आहे. कंपनी आपली अपडेटेड Raider 125 बाईक 19 ऑक्टोबर रोजी नवीन अवतारात लॉन्च करणार आहे. TVS नवीन Raider 125 MotoWars वर व्हर्च्युअल पद्धतीने लॉन्च करणार आहे. जे स्मार्ट डिव्हाइसेसवर लाइव्ह स्ट्रीम केले जाईल. 19 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 7 वाजता याचे प्रसारण सुरू होईल.

लवकरच येणार प्लॅनेट मराठीवर ‘बेबी ऑन बोर्ड’ नवीन सीरिज

Latest Posts

Don't Miss