उर्फी थांबवणार तिचा नंगानाच? उर्फी जावेदला पोलिसांकडून नोटीस

उर्फी जावेद हिला पोलिसांकडून नोटीस बजावल्याचे माहिती मिळतेय.

उर्फी थांबवणार तिचा नंगानाच? उर्फी जावेदला पोलिसांकडून नोटीस

मागील काही दिवसांपासून अभिनेत्री उर्फी जावेद हिच्या कपड्यांवरून महाराष्ट्रातील वातावरण चांगलं तापल्याच पाहायला मिळत आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फीच्या कपड्यांविरोध विरोध दर्शवत, उर्फी जावेद विरोधात कारवाई करण्याची मागणी पोलीस आयुक्तांकडे केली होती. मात्र त्यानंतर उर्फीवर कोणतीही कारवाई करण्यात आली नव्हती. त्यानंतर देखील अनेकदा चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेत उर्फीवर आरोप करत होत्या तसेच “उर्फी दिसेल तिथे तीच आधी थोबाड फोडेन”, असं वक्तव देखील होत. त्यानंतर उर्फी तिच्या ट्विटर अकॉउंटवरून ट्विट करत चित्रा वाघ यांना सतत डिवचत असल्याचं देखील पाहायला मिळत होत. त्यानंतर उर्फीने देखील महिला आयोगाकडे चित्रा वाघ यांच्या विरोधात मॉब लिंचिंगची तक्रार केली होती. मात्र आता उर्फी जावेद हिला पोलिसांनी नोटीस बजावली आहे.

काल म्हणजेच शुक्रावर १३ जानेवारी रोजी उर्फी जावेदने महिला आयोगाकडे चित्रा वाघ यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. चित्रा वाघ यांनी केलेल्या विरोधामुळे आणि दिलेल्या धमकीमुळे उर्फी जावेदने मॉब लिंचिंगचा धोका असल्याची भीती व्यक्त करत चित्रा वाघ यांच्या विरोधात तक्रार केली होती. त्यानंतर चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेत उर्फीचा नंगानाच थांबवूनच दाखवेल, असं वक्तव्य केलं होत. त्यानंतर आता उर्फी जावेद हिला पोलिसांकडून चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस बजावल्याची माहिती मिळतेय. ठाण्यातील अंबोली पोलीस ठाण्यात उर्फी जावेदची चौकशी होणार असून उर्फीला आज पोलीस ठाण्यात हजर होण्याची नोटिस देण्यात आली आहे. चित्रा वाघ यांच्या तक्रारीची मुंबई पोलिसांनी दखल घेतली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक शैला कोराडे या प्रकरणाची चौकशी करणार आहेत.

दरम्यान, उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांच्या वादात अनेक मोठ्या नेत्यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली होती. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांसह ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि गायक अमृता फडणवीस यांनी देखील याविषयी आपली प्रतिक्रिया देत एकअर्थी उर्फीचे समर्थन केले होते.

मात्र, आता पोलिसांनी बजावलेल्या या नोटिसीला उर्फी जावेद काय प्रतिक्रया देते? आजच्या चौकशीमधून काय स्पष्ट होतंय? तसेच नवीन प्रकारचे कपड्यांची फॅशन करणे थांबवते का? हे पाहणं महत्वाचं आहे. तसेच यावर चित्रा वाघ देखील काय म्हणतात, हे पाहणं देखील तितकाच महत्वाचं राहणार आहे.

हे ही वाचा:

मागण्या पूर्ण करण्यासाठी विद्यार्थी ठाम, १२ तासांहून अधिक काळ लोटला तरी आंदोलन सुरूच

राशी भविष्य,१४ जानेवारी २०२३ आजचा सुचलेला विचार तुमच्या जीवनासाठी ठरेल अत्यन्त महत्वाचा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version