spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Valentine Week 2023 Full List, रोज डे ते किस डे पर्यंत जाणून घ्या सर्व तारखा…

जगभरातील प्रेमी व्हॅलेंटाईन दिवसाची वाट आतुरतेने पाहत असतात. व्हॅलेंटाईन दिवस हा जवळ येत आहे. प्रत्येकाला या दिवशी त्याच्या जोडीदाराला त्याच्या प्रेमाची औपरिक पानांची कबुली देण्याची संधी मिळत असते. १४ फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे आहे.

जगभरातील प्रेमी व्हॅलेंटाईन दिवसाची वाट आतुरतेने पाहत असतात. व्हॅलेंटाईन दिवस हा जवळ येत आहे. प्रत्येकाला या दिवशी त्याच्या जोडीदाराला त्याच्या प्रेमाची औपरिक पानांची कबुली देण्याची संधी मिळत असते. १४ फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे आहे. त्या आधीचा पूर्ण एक आठवडा असतो जो रोज कोणत्या ना कोणत्या डे ने साजरा केला जातो. त्यामुळे या व्हॅलेंटाईन डे ची उत्सुकता आधीच चालू होत असते. व्हॅलेंटाईन वीक (Valentine week) हा ७ फेब्रुवारीला सुरु होणार आहे. आणि तोच १४ फेब्रुवारीपर्यंत चालतो. हा कालावधी प्रेम सप्ताह म्हणून ओळखला जातो. व्हॅलेंटाईन विक वेळापत्रक हे बुधवार ७ फेब्रुवारी पासून सुरु होणार आहे. व्हॅलेंटाईन वीक २०२३ चे वेळापत्रक आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

व्हॅलेंटाईन डे हा व्हॅलेंटाईन वीक चा शेवटचा दिवस असतो. त्या आधी अनेक डे चा समावेश असतो. त्यामध्ये रोज डे, टेडी डे, हग डे, प्रॉमिस डे, चॉकलेट डे, किस डे आणि सर्वात शेवटी व्हॅलेंटाईन डे यांचा समावेश आहे. व्हॅलेंटाईन वीकमधील दिवसांची संपूर्ण यादी खाली दिली आहे.

७ फेब्रुवारी – रोझ डे (Rose Day) – या दिवशी तुम्ही तुमच्या क्रशसोबत जाऊ शकता आणि त्यांच्याबद्दल तुमच्या भावना एक गुलाबाचे फूल देऊन व्यक्त करू शकता.

८ फेब्रुवारी – प्रपोज डे (Propose day) – या दिवशी तुम्ही तुमच्या क्रशशी संपर्क साधू शकता आणि त्यांना त्यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटते तुमच्या मनातील भावना ते थेट सांगू शकता. तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीला त्या दिवशी प्रपोज देखील करू शकता.

९ फेब्रुवारी – चॉकलेट डे (Chocolate Day) – या दिवशी आपल्या प्रिय व्यक्तींना चॉकलेट दिल्याने आनंद पसरण्यास मदत होईल.

१० फेब्रुवारी – टेडी डे (Teddy Day) – तुमच्या प्रिय व्यक्तीला भेट देण्यासाठी सर्वात आकर्षक भेटवस्तू म्हणजे टेडी.

११ फेब्रुवारी – प्रॉमिस डे (Promise Day) – वचने तयार करणे आणि ती राखणे सोपे आहे. वचने देणे हे अद्भुत असले तरी, वचने देण्यापेक्षा आपल्या प्रिय व्यक्तीची आपल्याला काळजी असणे आणि ते दाखवणे त्यामध्ये आपण आनंदी असणे गरजेचे आहे.

१२ फेब्रुवारी – हग डे (hug day) – आपल्या प्रिय व्यक्तींना मिठी मारून, आपण आपल्या मधला आपला आनंद व्यक्त करू शकता.

१३ फेब्रुवारी – किस डे (kiss day) – प्रेम व्यक्त करण्याचा सर्वात गोड मार्ग म्हणजे किस. व्हॅलेंटाईन वीकच्या दिवसांतील हा सहावा दिवस आहे. प्रेम व्यक्त करण्याची उत्तम पद्धत म्हणजे किस, परंतु इतरही अनेक मार्ग आहेत.

१४ फेब्रुवारी – व्हॅलेंटाईन डे (Valentine’s Day) –  व्हॅलेंटाईन डे हा शेवटचा आहे पण नक्कीच कमी नाही तुमची किती काळजी आहे हे दाखवण्यासाठी तुमच्या प्रिय व्यक्तीसोबत संपूर्ण दिवस घालवा. तुमची आपुलकी दर्शविण्यासाठी भेटवस्तू द्या जसे की चॉकलेट आणि गुलाब पाठवा. आणि आनंद व्यक्त करा.

 

हे ही वाचा:

पाणी पिल्यानंतर ‘या’ पदार्थांचे सेवन केल्यास होतील समस्या

तीच तीच डाळ खाऊन कंटाळा आलाय?, तर बनवा साऊथ इंडियन स्टाईल रस्सम

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss