spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Valmiki Jayanti 2022: आज महर्षि वाल्मिकी जयंती, जाणून घ्या खास गोष्टी…

महर्षी वाल्मिकी (Maharshi Valmiki) यांची जयंती दरवर्षी अश्विन महिन्यातील पौर्णिमेला साजरी केली जाते. महर्षी वाल्मिकी यांची जयंती संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. आज ९ ऑक्टोबर २०२२ रोजी वाल्मिकी जयंती आहे.

महर्षी वाल्मिकी (Maharshi Valmiki) यांची जयंती दरवर्षी अश्विन महिन्यातील पौर्णिमेला साजरी केली जाते. महर्षी वाल्मिकी यांची जयंती संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. आज ९ ऑक्टोबर २०२२ रोजी वाल्मिकी जयंती आहे. हिंदू धर्मातील महत्त्वाचे महाकाव्य रामायण (Ramayan) महर्षी वाल्मिकी यांनी रचले होते. वाल्मिकींनी संस्कृत भाषेत लिहिलेले रामायण सर्वात जुने मानले जाते. संस्कृत भाषेतील पहिल्या महाकाव्याच्या रचनेमुळे महर्षी वाल्मिकी यांना आदिकवी असेही म्हणतात. महर्षी वाल्मिकींच्या जयंतीनिमित्त देशभरात अनेक ठिकाणी धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात, तबल्या काढल्या जातात आणि मंदिरांमध्ये वाल्मिकीची पूजा केली जाते. महर्षी वाल्मिकीजींचे नाव आणि ते महर्षी बनण्याची कथा खूप मनोरंजक आहे.

हिंदू कॅलेंडरनुसार, वाल्मिकी जयंती अश्विन महिन्याच्या पौर्णिमेला साजरी केली जाते. या वेळी पौर्णिमा ९ ऑक्टोबर रोजी पहाटे ३:४१ वाजता सुरू होईल आणि १० ऑक्टोबर रोजी पहाटे २:२४ वाजता समाप्त होईल. उदयतिथीनुसार ९ ऑक्टोबर रोजी वाल्मिकी जयंती साजरी केली जाणार आहे. महर्षी वाल्मिकीबद्दल इतिहासात अनेक कथा प्रचलित आहेत आणि पौराणिक कथेनुसार वाल्मिकींचे नाव रत्नाकर होते आणि तो एक डाकू होता. पण नंतर जेव्हा त्याला समजले की आपण चुकीच्या मार्गावर आहोत, तेव्हा त्याने हा मार्ग सोडून धर्माचा मार्ग स्वीकारला. त्यांना देवर्षी नारदांनी रामनामाचा जप करण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर वाल्मिकीजी रामनामात लीन होऊन तपस्वी झाले. त्यांच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन ब्रह्माजींनी त्यांना ज्ञानाचे भांडार दिले आणि मग त्यांनी रामायण लिहिलं. ज्याची पूजा आज हिंदू धर्मात धार्मिक ग्रंथ म्हणून केली जाते आणि वाचली जाते.

महर्षी वाल्मिकींच्या जन्माबाबत कोणताही ठोस पुरावा नाही. काही मान्यतेनुसार, महर्षि कश्यप आणि अदिती यांचा नववा मुलगा वरुण आणि त्याची पत्नी चारशनीच्या पोटी त्यांचा जन्म झाला. असे म्हणतात की, जन्मानंतर त्यांना भिल्ल समाजातील लोकांनी बालपणीच पळवून नेले, त्यानंतर ते भिल्ल समाजात वाढले आणि नंतर त्यांचे नाव ‘वाल्या’ पडले व सर्व लोक त्यांना ‘वाल्या कोळी’ म्हणू लागले. कुटुंबाचे पोट भरण्यासाठी तो लोकांना लुटायचा.

वाल्याचा वाल्मिकी कसा झाला ?

रामायणाचा रचयिता म्हणून ओळखले जाणारे वाल्मिक लहानपणी लुटमारीच्या धंदा करत असे. म्हणजेच वाल्मिकींचे आई आणि त्यांचे वडील त्यांना किराता जवळ ठेवून तपश्चर्येला जात असे तेव्हा वाल्मिकी गुपचूप चोरी करत असे.म्हणूनच सर्व लोक त्यांना वाल्या कोळी असे म्हणू लागले. वाल्मीकि एकदा काही ऋषींना घेरले होते. परंतु ते ऋषी हुशार होते त्यांनी त्याला उपदेश केला. त्याच्या जीवावर जगणारे त्याचे कुटुंबीय त्याच्या पापात वाटेकरी होतात काय असे विचारून येण्यास सांगितले.कोणीही जेव्हा काहीच बोलले नाही तेव्हा त्यास पश्चाताप झाला. वाल्मिकी जिथे बसले होते तिथेच राम मंत्राचा जप सुरू केला. जप करता करता त्याच्या अंगाभोवती वल्मीक म्हणजे वारूळ तयार झाले. म्हणूनच त्यांना वाल्मिकी असे नाव मिळाले.

वाल्मिकी हे नाव कसे पडले?

एकदा वाल्मीकीजी तपश्चर्येला बसले होते. बराच वेळ चाललेल्या या तपस्यामध्ये तो इतका तल्लीन झाले होते की त्याच्या संपूर्ण शरीराला वाळवी लागली. पण त्यांनी तपश्चर्येत भंग न आणू घेता अध्यात्मिक साधना सुरू ठेवली. तेव्हाच त्यांनी डोळे उघडले. असे म्हटले जाते की ज्या ठिकाणी वाळवी आपले घर बनवते त्याला वाल्मिकी म्हणतात, म्हणून ते वाल्मिकी म्हणून ओळखले जाऊ लागले.

हे ही वाचा:

शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकरांनी पक्षचिन्हाबाबत सूचक ट्विट

व्हाटसपवर करा डाउनलोड आधारकार्ड आणि पेनकार्ड या सोप्या पद्धतीने

Diwali 2022 : नवरा बायकोच्या प्रेमाचं नात जपणारा ‘दिवाळी पाडवा’ सणाची जाणून घ्या परंपरा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss