सलग दुसऱ्या दिवशी वंदे भारत एक्स्प्रेस धडकली प्राण्यांच्या कळपाला, पुन्हा झाले एक्स्प्रेसचे नुकसान

एक दिवस आधी गुरुवारी वंदे भारत ट्रेनची म्हशींच्या कळपाशी टक्कर झाली, त्यानंतर त्याचा समोरचा पटल बदलावा लागला.

सलग दुसऱ्या दिवशी वंदे भारत एक्स्प्रेस धडकली प्राण्यांच्या कळपाला, पुन्हा झाले एक्स्प्रेसचे नुकसान

नुकत्याच सुरू झालेल्या गांधीनगर-मुंबई वंदे भारत ट्रेनला सलग दुसऱ्या दिवशी किरकोळ अपघात झाला. गुजरातमधील आनंद स्थानकाजवळ शुक्रवारी वंदे भारत ट्रेनने एका गायीला धडक दिल्याने गाडीच्या समोरच्या पटलाचे किरकोळ नुकसान झाले. एक दिवस आधी गुरुवारी वंदे भारत ट्रेनची म्हशींच्या कळपाशी टक्कर झाली, त्यानंतर त्याचा समोरचा पटल बदलावा लागला. आजच्या धडकेने ट्रेनचे फारसे नुकसान झाले नसल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. तरी एक्सप्रेसच्या समोरच्या भागावर एक डेंट आहे.

वंदे भारत ट्रेनची सलग दुसऱ्या दिवशी जनावरांना धडकली. ही घटना आज दुपारी ३.४८ वाजता मुंबईपासून ४३२ किमी अंतरावर असलेल्या आनंदजवळ घडली. पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी सांगितले की, ट्रेनच्या पुढील भागात एक छोटासा डेंट आहे. सर्व प्रवासी सुखरूप असल्याचे त्यांनी सांगितले.

वंदे भारत ट्रेनच्या जनावरांच्या या धडकेवर रेल्वे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, गुजरातमध्ये गायी आणि म्हशींचे पालनपोषण करणाऱ्यांना वंदे भारत एक्स्प्रेसचे वेळापत्रक माहीत नाही. त्यामुळेच म्हशींचा कळप रुळावर आला. आता त्यांना जागृत करण्यासाठी मोहीम राबविण्यात येणार आहे.

हे ही वाचा:

Maharashtra Politics : निवडणूक आयोगाकडून ठाकरे गटाला मुदत वाढ, आयोगाचं उद्धव ठाकरेंना पत्र

शिवसेना आणि काँग्रेसला आमच्याकडून निरोप गेला आहे; युतीसंदर्भात आपली…; प्रकाश आंबेडकर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version