spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Pune Loksabha Election: Vasant More यांचा ‘वंचित’ मध्ये प्रवेश, पुण्यातून लढणार लोकसभा निवडणूक

वंचितने आपली तिसरी यादी जाहीर केली. या यादीत त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी नेते वसंत मोरे (Vasant More) यांना पुण्यातून उमेदवारी देऊ केली आहे.

आगामी लोकसभा निवडणुकणांच्या (Loksabhaa Election 2024) रणधुमाळीला आता सुरुवात झाली आहे. राज्यात पुन्हा एकदा महायुती (Mahayuti), महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aghadi) (VBA) यांच्यात तिहेरी लढत रंगणार आहे. महाविकास आघाडीसोबत जागावाटपाचा तिढा कायम राहिल्याने वंचित बहुजन आघाडीने स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतला. वंचितने याआधी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांच्या दोन याद्या जाहीर केल्या होत्या. मंगळवारी, (२ एप्रिल) रात्री वंचितने आपली तिसरी यादी जाहीर केली. या यादीत त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी नेते वसंत मोरे (Vasant More) यांना पुण्यातून उमेदवारी देऊ केली आहे. वसंत मोरे यांनी आपल्या अधिकृत “X” अकाऊंटवरून याची माहिती दिली. याबाबत वसंत मोरे यांनी सांगितले, “माझ्या पुणे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि सर्व जात-धर्मीय ‘वंचित बहुजनांसाठी’ मी मैदानात येतोय.. बदल घडणार…वसंत फुलणार….!”

वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत “X” अकाऊंटवरून मंगळवारी रात्री लोकसभा लिवडणुकीसाठी उमेदवारांची तिसरी यादी प्रसिद्ध करण्यात आली. या यादीत ५ उमेदवारांना लोकसभेसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. यापैकी पुणे लोकसभा मतदारसंघातून (Pune Loksabha Election) वसंत मोरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच, नांदेड मतदारसंघातून ऍड. अविनाश विश्वनाथ भोसीकर, परभणीमधून बाबासाहेब भुजंगराव उगले, औरंगाबादमधून अफसर खान आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातून मंगलदास बांदल यांनाही उमेदवारी देण्यात आली आहे.

वसंत मोरे यांना वंचितने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी दिल्याने पुणे लोकसभा मतदारसंघात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी विरुद्ध वंचित बहुजन आघाडी अशी तिहेरी लढत रंगणार आहे. महायुतीकडून महायुतीकडून भाजप (BJP) नेते मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे (congress) रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे, पुणे लोकसभेची यंदाची निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे.

हे ही वाचा:

भाजप खासदार Unmesh Patil करणार शिवसेनेत प्रवेश? Sanjay Raut यांची निवासस्थानी घेतली भेट

Ramesh Baraskar यांची राष्ट्रवादीतून हकालपट्टी, माढा मतदारसंघात तिरंगी लढत

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss