spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

धनंजय मुंडे यांचा जिम मधील वर्कआउट करतानाचा व्हिडिओ होतोय व्हायरल

धनंजय मुंडे यांनी त्यांच्या इंस्टाग्राम हँडल वरून टाकलेला हा व्हिडिओ सध्या तुफान वायरल होतोय.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे हे त्यांच्या भाषणे शैलीतून सतत चर्चेत असतात आता आघाडी सरकार मधील मंत्रिमंडळातून विश्रांती मिळाल्यानंतर आता धनंजय मुंडे आपल्या फिटनेस कडे लक्ष देत आहेत परळीतील एका जिम मध्ये त्यांचा वर्कआउट करतानाचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती चांगलाच चर्चेत आला आहे. या व्हिडिओ वरती फिटनेस लवर त्याचबरोबर तरुण मंडळी असंख्य प्रतिक्रिया देत आहेत.

सध्या महाराष्ट्रातील राजकारण हे तापलेले आहे. प्रत्येक नेत्याचं विरोधी पक्षातील नेत्याच्या हालचालीकडे बारकाईने लक्ष आहे. त्यातच बीड मधील मुंडे घराण्यातील व्यक्तीचा प्रत्येक गोष्टीवर सोशल मीडिया वरती ही चर्चा होत असते. धनंजय मुंडे यांनी त्यांच्या इंस्टाग्राम हँडल वरून टाकलेला हा व्हिडिओ सध्या तुफान वायरल होतोय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Dhananjay Munde (@dhananjay_munde)

 या व्हिडिओमध्ये धनंजय मुंडे हे वेगवेगळ्या प्रकारची एक्सरसाइज करताना दिसतात. त्यांचे ट्रेनर हे त्यांना मार्गदर्शन करतात. त्याचबरोबर या व्हिडिओला त्यांनी एक इंग्लिश गाणं बॅकग्राऊंडला दिलेला आहे. त्यामुळे हा व्हिडिओ आणखीनच रंजक दिसतोय.

ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेऊ नये धनंजय मुंडेंचे आव्हान

राज्यात स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ऑगस्ट महिन्यात निवडणुका आयोगाकडून जाहीर करण्यात आलेले आहेत. मात्र ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेतल्या जाऊ नये अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली. जाहीर झालेल्या 92 नगरपरिषदेच्या निवडणुका आरक्षण झाल्याशिवाय होऊ नये अशी ठाम भूमिका धनंजय मुंडे यांनी मांडली.

Latest Posts

Don't Miss