spot_img
Sunday, September 22, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

प्रवाशांना पॅकेज देण्यासाठी ट्रेनच्या मागे धावणाऱ्या डंझो एजंटचा व्हिडिओ होतोय व्हायरल

"पुष्पा झुकेगा नहीं, दुंझो रुकेगा नहीं,"

इंटरनेटवर विचित्र काँटेंटची कमतरता नाही आणि आपण सर्व वेळोवेळी अशा व्हिडिओंचे साक्षीदार ठरतं असतो. आणि नेहमीप्रमाणे, असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ऑनलाइन वेगाने व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये, या व्हिडिओत डन्झो डिलिव्हरी एजंट एका प्रवाशाला पॅकेट देण्यासाठी ट्रेनच्या मागे धावताना दिसत आहे. ही क्लिप मुंबईस्थित प्रसिद्ध छायाचित्रकार विरल भयानी यांनी इंस्टाग्रामवर शेअर केली होती आणि ती ४ लाखांहून अधिक वेळा पाहिली गेली आहे.

आता व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, डन्झो डिलिव्हरी एजंट एका स्टेशनवर धावताना दिसत आहे. तो प्रत्यक्षात चालत्या ट्रेनमध्ये बसलेल्या प्रवाशाला पॅकेज देण्याचा प्रयत्न करत होता. डिलिव्हरी एजंट शक्य तितक्या वेगाने धावला आणि ते पॅकेट यशस्वीरित्या सुपूर्द करण्यात यशस्वी झाला. प्रवासी शेवटी आनंद साजरा करताना दिसतात. सोशल मीडिया वापरकर्त्यांनी याला फुल-ऑन दिलवाले दुल्हनी ले जायेंगे क्षण असे संबोधले ज्यामध्ये काजोलने साकारलेली सिमरन देखील ट्रेनच्या मागे धावत होती.

“पुष्पा झुकेगा नहीं, दुंझो रुकेगा नहीं,” अशा कॅप्शन सह हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर यावर कमेंट्सचा पाऊस पडत आहे.

यातील एका वापरकर्त्यांने म्हटले आहे की,मला हा व्हिडिओ फार आवडला.

तर दुसऱ्या वापरकर्त्यांने लिहिले की, या डिलिव्हरी बॉयला प्रोमोशन मिळायला हवं.

हे ही वाचा:

राजद्रोहाच्या गुन्ह्याप्रकरणी राणा दाम्पत्य न्यायालयात हजर

‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’चा प्रवास आता महागणार

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss