प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रांनी गणेशोत्सवानिमित्ताने शेअर केलेला व्हिडिओ नक्कीच पहा

प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रांनी गणेशोत्सवानिमित्ताने शेअर केलेला व्हिडिओ नक्कीच पहा

भारतातील प्रसिद्ध उद्योगपती म्हणून ओळख असलेले आनंद महिंद्रा हल्ली इंटरनेटवर खूप सक्रिय असतात. ते दररोज ट्विटरच्या माध्यमातून काही ना काही एक सामाजिक संदेश देत असतात. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांना दररोज काही ना काही मजेशीर रंजक आणि प्रेरणादायी गोष्ट पाहायला मिळत असते. त्यांनी शेअर केलेल्या प्रत्येक व्हिडिओ किंवा मजकूर अनेकांना आवडत असतो. त्यावेळी आनंद महेंद्र यांनी गणेश चतुर्थी निमित्त गणेश भक्तांसाठी एक व्हिडिओ शेअर केला आहे.

आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवर महिंद्रा ट्रकची एक जाहिरात केली आहे ज्यामध्ये एक ट्रक चालक बाप्पाला घरी घेऊन जात आहे या दरम्यान तो गणपतीकडे आईच्या तब्येतीची आणि मुलीच्या शिक्षणाची व बायकोच्या तक्रार करताना दिसतोय. हा व्हिडिओ पाहताना असा भास होतो की एका मित्राप्रमाणे तो गणपती बाप्पाची बोलत गणपती बाप्पाला घरी घेऊन जात आहे. हा मनमोहक व्हिडिओ ट्विटर वर शेअर करत आनंद महिंद्रा यांनी लिहिले की, “भारताच्या गणेश चतुर्थीला एक कथा आहे. ट्विट शेअर केल्यानंतर अवघ्या काही तासात त्याला भरभरून प्रतिसाद मिळाला अनेक लोकांनी कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया देखील नोंदवली.

हेही वाचा : 

‘या’ निर्मात्याच्या सल्ल्याने साइन केला चित्रपट, अनन्या पांडेचा खुलासा

या व्हिडिओद्वारे महिंद्रा अँड महिंद्रा समूहाच्या वतीने देशवासीयांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या आहेतच त्याचबरोबर ह्या व्हिडिओ मधून एक सामाजिक संदेशही देण्यात आलेला आहे जेव्हा देव वाहतूक नियम पाळू शकतो तर मानव का नाही वास्तविक हा संदेश अशा चालकांसाठी आहे जे वाहतुकीचे नियम डोळ्यासमोर ठेवू नये लावत नाहीत असे करून ते आपला जीव धोक्यात घालतात.

आनंद महिंद्रा यांची ही पोस्ट सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे आणि यूजर्स लोकांना प्रेरित करण्याच्या या पद्धतीचे कौतुक करत आहेत. या व्हिडीओसोबत त्यांनी ‘गणेश चतुर्थीची कथा… भारताची गोष्ट…’ असे कॅप्शन दिले आहे. महिंद्राच्या चेअरमनचे ट्विटरवर ९४ लाख फॉलोअर्स आहेत आणि त्यांची पोस्ट वेगाने व्हायरल होत आहे. आनंद महिंद्रा त्यांच्या ट्विटर अकाउंटवर प्रेरक सामग्री पोस्ट करण्यासाठी देखील ओळखले जातात.

गणेशोत्सवानिमित्त मुख्यमंत्री राज ठाकरेंच्या घरी जाणे औपचारिकता की, मनपासाठी नवीन समीकरण?

Exit mobile version