फेमस टिक टॉक स्टार आणि एसटी महामंडळात लेडी कंडक्टर असलेल्या महिलेवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. एसटी महामंडळाची प्रतिमा मलीन केल्याचा ठपका ठेवत या लेडी कंडक्टर ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईने महिला कंडक्टरला मोठा धक्का बसला आहे. धाराशिव जिल्ह्यातील मंगल सागर पुरी या लेडी कंडक्टरला ऑन ड्यूटी असता स्वतःचे व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर व्हायरल करणे चांगलंच महागात पडल आहे. मंगल सागर पुरी या धाराशिव जिल्ह्यातील कळंब आगारामध्ये लेडी कंडक्टर म्हणून नोकरीस आहेत.
View this post on Instagram
हेही वाचा :
Dasara Melava : शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याला दिल्लीतून येतोय पैसा, राष्ट्रवादी नेत्याचा गंभीर आरोप
त्या इंस्टाग्राम रील्स बनवून शेअर करत होत्या. त्यांचे अनेक व्हिडिओ लोकांनी शेअर केले आहेत. या व्हिडिओला सोशल मीडियात प्रचंड प्रसिद्धी मिळत आहे. त्या महामंडळाच्या गणवेशावर व्हिडिओ शूट करत असून महामंडळाची प्रतिमा मलीन केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्याचबरोबर त्यांचा व्हिडिओ शूट करणाऱ्या सहकाऱ्यावरही कारवाई करण्यात आली आहे. अनेकदा कर्मचारी ऑन ड्युटी रील्स शूट करून व्हायरल करत असतात. त्यामुळे कधीकधी ते ट्रोल होतात तर कधीकधी त्यांना सपोर्ट केला जातो. तर या महिला कर्मचाऱ्याला निलंबित केल्यावर अनेक जणांनी संताप व्यक्त करत महामंडळाला धारेवर धरले आहे.
View this post on Instagram
Alia Bhatt: ‘भर पुरस्कार सोहळ्यात भाषण सुरु असताना बाळानं पोटात मारली लाथ’