spot_img
Tuesday, September 17, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Vikram Batra Birth Anniversary : कारगिल युद्धात प्राणाची आहुती देणाऱ्या विक्रम बत्रांविषयी माहीत आहे का तुम्हाला ?

Vikram Batra Birth Anniversary : कॅप्टन विक्रम बत्रा हे एक धाडसी आणि निस्वार्थी भारतीय सैन्य अधिकारी होते. त्यांना लहानपणपासूनच सैन्यात जाण्याची इच्छा होती आणि देशाविषयी मनात अपार प्रेम होते. विक्रम बत्रा यांचा जन्म ९ सप्टेंबर १९७४ रोजी हिमाचल प्रदेशातील पालमपूर ( Himachal Pradesh, Palampur) येथे झाला. हिमाचल प्रदेशात जन्मलेल्या बत्रा यांचे नशीब मोठे होते. १९९७ मध्ये ते भारतीय सैन्य दलात भरती झाले. त्यांनी त्वरीत एक कुशल आणि निर्भय नेता असल्याचे सिद्ध करून दाखवले.

त्यांनी पंजाब विद्यापीठ, चंडीगढ (Punjab University, Chandigarh) येथून वाणिज्य शाखेची पदवी मिळवली होती. कॅप्टन विक्रम बत्रा हे भारतीय सेनेचे अधिकारी होते ज्यांनी १९९९ मध्ये कारगिल युद्धादरम्यान देशासाठी सर्वोच्च बलिदान दिले. कारगिल युद्धादरम्यान, बत्रा यांची १३वी बटालियन, जम्मू-काश्मीर रायफल्सचा समावेश होता. त्यांनी ७ जुलै १९९९ रोजी पॉइंट ५१४० वर हल्ला करण्यासाठी स्वतःच्या इच्छेने भाग घेतला. त्यांच्या नेतृत्वामुळे त्यांच्या टीमला पॉइंट ५१४० वर कब्जा करण्यास मदत झाली.

विक्रम बत्रा यांच्या अतुलनीय धैर्य, दृढ निश्चय, नेतृत्व आणि सर्वोच्च बलिदानासाठी त्यांना मरणोत्तर देशाचा सर्वोच्च शौर्य पुरस्कार, परमवीर चक्र देण्यात आला.

विक्रम बत्रा यांच्या जीवनावर आधारित असणारा शेरशाह (Shershah) हा हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता. ज्यात अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा ( Siddharth Malhotra)आणि अभिनेत्री कियारा अडवाणी (Kiara Advani) यांनी पात्र साकारली आहेत.

वैयक्तिक जीवन (Personal Life)
विक्रम बत्रा (Vikram Batra) यांचे डिंपल चिमा (Dimple Chima) यांच्याशी प्रेमसंबंध होते. परंतु विक्रम यांच्या मृत्यू घटनेमुळे त्यांचे लग्न होऊ शकते नाही. परंतु विक्रम बत्रा यांच्या मृत्यूनंतरही डिंपल चीमा यांनी लग्न केले नाही. त्या सध्या एक शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत.

हे ही वाचा:

माझं डोकं फिरवू नका, तुमच्यात एवढी खुमखूमी असेल तर… राऊतांची Manoj Jarange Patil यांच्यावर जहरी टीका

विधानसभा निवडणुकीसाठी भाजप ऍक्शन मोडमध्ये; ‘या’ चार नेत्यांवर सोपवली जाणार महत्त्वाची जबाबदारी

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss