चांद्रयान ३चे विक्रम लँडर २२ सप्टेंबरपासून अ‍ॅक्टिव्ह होण्याची शक्यता

२३ ऑगस्ट २०२३ रोजी भारताचे चांद्रयान ३ (Chandrayaan 3) हे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहचले आणि भारताने एक नवा इतिहास रचला.

चांद्रयान ३चे विक्रम लँडर  २२ सप्टेंबरपासून अ‍ॅक्टिव्ह होण्याची शक्यता

२३ ऑगस्ट २०२३ रोजी भारताचे चांद्रयान ३ (Chandrayaan 3) हे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहचले आणि भारताने एक नवा इतिहास रचला.चंद्रावर मोहीम करणारा भारत हा चौथा देश आहे. चंद्रावर जाऊन विक्रम लँडेर (Vikram Lander) रोज नवनवीन अपडेट देत आहे. तर आता चांद्रयान ३ मोहिमेबाबत महत्वाचे अपडेट समोर आले आहेत. चांद्रयान ३ चा विक्रम लँडेर आता ‘स्लीप मोड’ (‘Sleep Mode’) मध्ये गेला आहे. भारताच्या चांद्रयान ३ ने २३ ऑगस्ट रोजी चंद्रावर सॉफ्ट लँडिंग केले. त्यानंतर आता प्रज्ञान रोव्हर चंद्रावरील माहिती गोळा करत आहे. तर ४ सप्टेंबर रोजी विक्रम लँडेर हा ‘स्लीप मोड’ गेला आहे.हा ‘स्लीप मोड’ २२ सप्टेंबर रोजी ऍक्टिव्ह होण्याची शक्यता आहे.

भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने ट्विटरवरून चांद्रयान संबधित काही माहिती दिली आहे. इस्रोने ट्विटमध्ये लिहिलं आहे ‘ “चांद्रयान-3 मोहिमेचा लँडर सकाळी 8:00 वाजता स्लीप मोडमध्ये गेला आहे. याआधी ChaSTE, रंभा-एलपी आणि आयएलएसए पेलोडने नवीन जागेवर इन-सीटू प्रयोग केले. यांनी जमा केलेली माहिती पृथ्वीवर पाठवण्यात आली. आता पेलोड बंद करण्यात आले आहेत. लँडरचा रिसिव्हर सुरु ठेवण्यात आला आहे. सोलार ऊर्जा आणि बॅटरी संपल्यानंतर विक्रम लँडर प्रज्ञान रोव्हरच्या बाजूला पूर्णपणे झोपी जाईल. लँडर 22 सप्टेंबरला पुन्हा सुरु होण्याची अपेक्षा आहे.” इस्रोकडून सोमवारी ट्विट करण्यात आले होते. विक्रम लँडर पुन्हा एकदा चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करण्यात यशस्वी ठरला आहे असे इस्रोने ट्विट करत लिहिले आहे. विक्रम लँडेरने पुन्हा एकदा चंद्रावर सॉफ्ट लँडिंग केलं आहे.

भारताचे चांद्रयान ३ हे यशश्वीरित्या चंद्रावर उतरले . त्यानंतर लँडरचे इंजिन सुरु झाले आणि अपेक्षेप्रमाणे लँडर सुमारे 40 सेंटीमीटरने उंच गेला. ३० ते ४० सेमीचा प्रवास करून चंद्रावर उतरले आहे. यानंतर भविष्यतील चंद्रावर परत येण्याची आणि चंद्रावर मानवी मोहिमांच्या आशा वाढल्या आहेत.

Exit mobile version