Viral Video : चालत्या मेट्रोत एका मुलीनं मारले मुलाच्या कानाखाली

इंटरनेटवर सातत्याने व्हायरल व्हिडीओ हे येत असतात. त्यातील काही व्हिडिओ सत्य परिस्थितवर असतात. तर काही प्रँक व्हिडिओ असतात.

Viral Video : चालत्या मेट्रोत एका मुलीनं मारले मुलाच्या कानाखाली

चालत्या मेट्रोत एका मुलीनं मारले मुलाच्या कानाखाली

इंटरनेटवर सातत्याने व्हायरल व्हिडीओ हे येत असतात. त्यातील काही व्हिडिओ सत्य परिस्थितवर असतात. तर काही प्रँक व्हिडिओ असतात. यातील काही व्हिडिओ पाहून तर अनेक वेळा आश्चर्य वाटते. असाच एक व्हिडिओ पाहून आपल्यालाही आश्चर्य वाटेल. या व्हिडिओमध्ये एक मुलगा आणि एक मुलगी शर्टच्या किमतीवरून भांडताना दिसत आहेत. हे भांडत एवढे वाढते, की संबंधित मुलगी मुलाशी भांडताना संतापाच्या भरात थेट त्या मुलाच्या मुस्काटात लगावून देते.

नेमका वाद कशामुळे होतो ?

आधी संबंधित मुलगी त्या मुलाला सांगते, की मी हा टी-शर्ट जारामधून हजार रुपयांना विकत घेतला आहे. यावर मुलगा म्हणतो, की हा टी-शर्ट केवळ 150 रुपयांचा आहे. यानंतर दोघांमध्ये जबरदस्त वाद सुरू होतो. आणि ती मुलगी संतापाच्या भरात त्याला कानाखाली देते. पण हे भांडण जितके खरे वाटावे तितकेच प्रँक वाटते, कारण काही लोकांनी म्हटले ,हे अगदी भावा-बहिणीसारखेच भांडण करत होते.

हेही वाचा : 

आमदार जयकुमार गोरेंना सर्वोच्च न्यायालयाकडून झटका

Exit mobile version