spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Viral Video : नाव ‘दत्ता’ अधिकाऱ्यांने रेशन कार्डवर लिहलं ‘कुत्ता’ ; पीडित तरुणाने कुत्रा बनून अधिकाऱ्याला शिकवला धडा

पश्चिम बंगालच्या बांकुरा जिल्ह्यातील एक व्यक्ती ‘कुत्र्या’सारखा भुंकतो, कुत्र्यासारखा दोन्ही हात आणि पाय धरून चालतो, गाडीच्या मागे धावतो आणि बोलत असतानाही भुंकतो. याच कारण म्हणजे त्या व्यक्तीच्या रेशन कार्डवर नाव बदलल्याने तो अशा प्रकारे वागत आहे. तर या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Trolls Officials (@trolls_official)

हेही वाचा : 

‘सत्तेला चिटकून आहात महाराष्ट्र तुमच्यावर थुंकतोय’; राज्यपालांच्या वादग्रस्त विधानावर राऊतांची संतप्त प्रतिक्रिया

दरम्यान, श्रीकांती कुमार दत्ता असं पीडित व्यक्तीचे नाव असून त्याच्या रेशन कार्डवर वारंवार आडनावाच्या चुका होत होत्या. तब्बल तीन वेळा श्रीकांती कुमार यांच्या दत्ता या आडनावाऐवजी कुत्ता असं छापण्यात आलं होतं. बऱ्याच वेळा नाव चुकल्यामुळे या व्यक्तीला संताप अनावर झाला आणि त्याने कुत्रा बनून अधिकाऱ्याला चांगलाच धडा शिकवला आहे. कुत्र्यासारखं भुंकत त्याने आपली कैफियत अधिकाऱ्यासमोर मांडल्याने अधिकारी नि:शब्द झाल्याचं पाहायला मिळालं.

Happy Birthday Rajkumar Hirani : सुपरहिट चित्रपटांचा दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांचा आज यांचा वाढदिवस

नाव बदलण्याच्या तक्रारीकडे अधिकारी दुर्लक्ष करत असल्यामुळे ही कल्पना श्रीकांतीला आली. स्थानिक अधिकारी कार्यालयात पोहोचल्यावर तो लोकांसमोर ‘कुत्र्या’सारखा वागू लागला. अधिकारी त्यांच्या अधिकृत वाहनात बसून कार्यालयात पोहोचले तेव्हा श्रीकांती त्यांना तक्रार अर्ज देत असतानाही कुत्र्यासारखे भुंकत राहिले. त्याच्या अशा वागण्याने अधिकारी घाबरले. त्यानंतर तिचा अर्ज घेतल्यानंतर अधिकाऱ्यांना संपूर्ण बाब समजली आणि त्यांनी कर्मचाऱ्यांना श्रीकांतीच्या नावातील ‘कुत्रा’ हा शब्द काढून रेशनकार्डवर तिचे योग्य नाव पुन्हा लिहिण्याचे आदेश दिले.

CISCO : मेटा, अॅमेझॉन नंतर सिस्को करणार ५ टक्के कर्मचार्‍यांची कपात

Latest Posts

Don't Miss