Viral Video : व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल; हत्तीने नक्की काय केलं ‘ते’ तुम्हीही पाहा

सोशल मीडियावर (Social Media) दररोज जगाच्या कानाकोपऱ्यातील भन्नाट व्हिडीओ शेअर होत असतात. हे व्हिडीओ नेटकऱ्यांचं लक्ष वेधतात आणि व्हायरल होतात.

Viral Video : व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल; हत्तीने नक्की काय केलं ‘ते’ तुम्हीही पाहा

सोशल मीडियावर (Social Media) दररोज जगाच्या कानाकोपऱ्यातील भन्नाट व्हिडीओ शेअर होत असतात. हे व्हिडीओ नेटकऱ्यांचं लक्ष वेधतात आणि व्हायरल होतात. कधी स्टंट, कधी मजेदार व्हिडीओ तर कधी काही घटनांचे व्हिडीओ चर्चेत येतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. हा व्हिडीओ आहे एका हत्तीचा (Elephant Viral Video) आहे या हत्तीने नेमकं काय केलं ते नक्की जाणून घ्या.

हत्तीचा हा व्हिडीओ एका ट्विटर अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. आयपीएस अधिकारी दीपांशु काबरा (Dipanshu Kabra) यांनी हत्तीचा हा मजेदार व्हिडीओ त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केला आहे. त्यांनी या व्हिडीओला कॅप्शन देत म्हटलं आहे की, ‘दिवाळीच्या सुट्ट्यांसाठी सर्वांनाच लवकरात लवकर घरी पोहोचायचं आहे.’ या व्हिडीओला अनेकांना रिट्विट केलं आहे. अवघ्या काही तासांपूर्वी शेअर करण्यात आलेला हा व्हिडीओ आतापर्यंत ७० हजारहून अनेक जणांनी पाहिला आहे. व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत.

या व्हायरल व्हिडीओमध्ये एक हत्ती माणसाप्रमाणे हात दाखवून बस थांबवताना दिसत आहे. माणूस ज्याप्रमाणे हात दाखवून बस थांबवतो. त्याप्रमाणे हा हत्ती सोंड दाखवून बस थांबवत आहे. इतकंच नाही तर हा हत्ती बस थांबल्यानंतर त्या बसमध्ये चढण्याचाही प्रयत्न करताना दिसतोय. या वेळी काही प्रवासी घाबरले. सोशल मीडियावर हा व्हिडीओ प्रचंड चर्चेत आहे. नेटकऱ्यांचं या व्हिडीओमुळे चांगलं मनोरंजन होत आहे. व्हिडीओ पाहणारा प्रत्येक जण खदखदून हसत आहे.

हे ही वाचा:

Diwali bollywood party 2022 : बॉलिवूड कलाकारांची दिवाळी पार्टी, एकापेक्षा एक स्टायलिश लुकमध्ये अभिनेत्यांनी लावली हजेरी

एटीएसची मोठी कारवाई; नाशिकमधून आजून एका पीएफआय कार्यकर्त्याला अटक

Amit Shah Birthday: गृहमंत्री अमित शहांच्या ५८व्या वाढदिवसानिमित्त PM मोदींसह सर्व नेत्यांनी दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version